Awaj India
Register
Breaking : bolt
*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करूया: शुभांगी अडसूळचर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिकसिंधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - अमल महाडिकआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडपर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार - राजेश क्षीरसागर बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर*

जाहिरात

 

हिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

schedule08 Apr 24 person by visibility 149 categoryगुन्हे


कोल्हापूर दि.८ देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेते, पदाधिकारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप यावेळी होत असतात. परंतु समाजातील काही समाज कंटकांच्यावतीने जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सध्या शहरात सुरु आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रकार घडत आहे. नुकतीच रोहित कुंभार या व्यक्तीने भारत माता, प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली आहे. भारतीय जनता पार्टी सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.

याविषयात सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन सादर केले.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी संबंधित पोस्ट बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निदर्शनास आणून दिली अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून अशा लोकांना वेळीच कठोर शासन करण्याची मागणी केली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान तसेच हिंदू देव देवींच्या विटंबनेच्या घटना येथून पुढे सहन केल्या जाणार नाहीत असे सांगत प्रसंगी भाजपा कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे नमूद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर पोस्टची सत्यता स्वत: पडताळली याबाबत आपल्या सायबर क्राईमच्या अधिका-यांना सूचना करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन, अॅड संपतराव पवार, अमर साठे, शैलेश पाटील, प्रदीप उलपे, अनिल कामत, अमेय भालकर, सुनील पाटील, रविकिरण गवळी, हर्षद कुंभोजकर आदी उपस्थित होते.



जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes