सन 2021 मध्ये पुर बाधीत झालेल्या मिळकतींना करामध्ये सवलत
schedule21 May 22 person by visibility 224 categoryउद्योग

कोल्हापूर ता.20 : महानगरपालिकेच्यावतीने जुलै - ऑगस्ट 2021 मध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पुरबाधीत झालेल्या मिळकतींना शासनाचे कर वगळता मालमत्ता करात सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरामध्ये बाधीत झालेल्या मिळकत धारकांनी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये लेखी अर्ज करावेत. यासाठी संबधीत मिळकत धारकांनी नागरी सुविधा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत. या अर्जामध्ये मिळकतीचा करदाता क्रमांक नमुद असणे आवश्यक आहे. मिळकतीची थकबाकी संपुर्ण भरली असणे गरजेची आहे. तसेच शक्य असल्यास पंचनामा प्रत आर्जासोबत जोडावी. ती नसलेस शासनामार्फत देणेत आलेल्या सानुग्रह अनुदानाच्या पासबुकाची छायांकीत प्रत जोडावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
30 जुन 2022 अखेर करामध्ये 6 टक्के सूट
तसेच सन 2022-23 मधील शहरातील सर्व मिळकतीची कराची देयके महानगरपालिकेच्या http://kolhapurcorporation.gov.in :8080/KMCWEB/PT/CollWeb.aspx या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. सन 2022-23 ची देयके दि.30 जुन 2022 अखेर भरलेस त्यांना करामध्ये 6 टक्के सवलत मिळणार आहे. यानंतर 30 सप्टेंबर अखेर करामध्ये 4 टक्के व 30 नोव्हेंबर अखेर करामध्ये 2 टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांनी बिलाची रक्कम भरणा करणेस येते वेळी मागील वर्षाचे देयक अथवा कर भरणा पावती सोबत आणावी अथवा नागरी सुविधा केंद्रामध्ये करदाता क्रमांक सांगावा. कर भरणा करणेसाठी ऑनलाईन बरोबरच गुगल पे, फोन पे तसेच इतर युपीआय वॉलेट व्दारे देखील कर भरणा करणेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन कर भरणा करणेबाबत काही अडचण आलेस महापालिकेच्या मध्यवर्ती माहिती केंद्र 0231-2540988 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी या सवलत योजनेचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.