Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आमदार प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

schedule21 Aug 22 person by visibility 1830 categoryराजकीय

 
गारगोटी प्रतिनिधी :

 वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी पावसाळी अधिवेशननंतर सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून सदरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांना शिष्टमंडळ भेटले.

 महाराष्ट्र राज्यात विविध स्वयंसेवी संस्थामार्फत २३८८ अनुदानित वसतिगृहे चालविली जात असून या वसतीगृहाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८१०४ इतकी आहे. हे सर्व कर्मचारी सध्या तुटपुंज्या मानधनावर चोवीस तास सेवा बजावत आहेत. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांच्या आश्रमशाळांशी संलग्न वसतीगृहातील पदे नियमित वेतन श्रेणीवर कार्यरत आहेत. वास्तविक पहाता वसतिगृह ही शासनाची १९६० पासूनची मुळची योजना असून आश्रमशाळा ही योजना सन १९७६ नंतर कार्यरत आहे. 

 अनुदानित वसतिगृह कर्मचारी यांना सध्या अधिक्षक रू. १०००० , स्वयंपाकी रू.८५०० व चौकीदार व मदतनीस रू. ७५०० दरमहा मानधन दिले जाते. दोन्ही ठिकाणच्या वसतिगृहातील कर्मचारी चोवीस तास कार्यरत असतात. परंतु अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्याबाबत रजा, वैद्यकीय सुविधा, व इतर कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत पण काम मात्र चोवीस तास तेही तुटपुंजा मानधनात अशी अवस्था आहे. 

शासकीय वसतिगृह, निवासी शाळा,वि.जा.भ.ज. व आदिवासीची आश्रमशाळा सलग्न वसतिगृहे, तसेच अनुदानित वसतिगृहे या सर्वांचे कार्य, त्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयोगट व वर्ग समान आहेत. परंतु कर्मचाऱ्याच्या वेतनात मात्र प्रचंड तफावत आहे.त्यामुळे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना समान काम समान दाम या तत्वानुसार तात्काळ वेतन श्रेणी लागू करावी अशा मागण्यांचे निवेदन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साताप्पा कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. 

 यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद पांगिरेकर, श्री.नामदेवराव कांबळे, रविंद्र कांबळे (कापशी), प्रसाद कांबळे, कर्मचारी संघटनेचे सचिव साताप्पा कांबळे, प्रकाश कांबळे, संतोष पताडे, चंद्रकांत कांबळे, विशाल कांबळे, सदाशिव हेगडे, विजय कांबळे, अधिक्षिका प्रज्ञा कांबळे, अनिल देसाई, सुचित कांबळे, साताप्पा कांबळे यासह अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes