+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule14 Nov 22 person by visibility 363 categoryआरोग्य

कोल्हापूर (प्रतिनिधी):- 
जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रदूषण असलेल्या घटकाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. प्लॅस्टिकची पिशवी घेऊन जाणाऱ्याला पाच हजार रुपये दंड. प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या लाखो प्लास्टिकच्या पिशव्या कारखान्यांनाही पाच हजार रुपयेचा दंड. पाच हजार रुपयांमध्ये पाहिजे तेवढे प्रदूषण वाढवा असाच नियम या प्लॅस्टिकच्या उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना लागू पडला आहे.

 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाणून-बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रदूषण नियंत्रण मंडळा मुळेच जिल्ह्यात प्रदूषण वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. प्रदूषणाच्या बाबतीत कारवाई करण्याचा कोणताही सपाटा नाही. जागृत नागरिकांनी तक्रार केली तरी हप्ते सुरू असल्याकारणाने या अधिकाऱ्यांना कारवाई करणे कठीण होते.
 पर्यावरण प्रेमींनी नियंत्रण मंडळाच्या लक्षात काही गोष्टी आणून दिल्या तर यांचे अधिकारी जागेवर नसतात असा प्रसंग अनेक वेळा येत आहे. तक्रार करायची म्हटली तर येथील अधिकारी प्रमोद माने कोणताही प्रतिसाद देत नाहीत. यापेक्षा महानगरपालिकेकडून तरी कोणतीच कारवाई होत नाही. अवैधरित्या प्लास्टिक विक्री सुरू

 कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिबंदीत प्लास्टिक विक्री जोरात सुरू आहे. तत्कालीन पालिका आयुक्त कलशेट्टी याच्या कार्यकाळात शा व्यावसायिक चोरीछुपे व्यवसाय करीत होते, मात्र त्यावेळी कारवाई मोठया प्रमाणात दाखल करण्यात आल्या होत्या. आता मात्र या प्लास्टिक व्यवसाय करणाऱ्या च्या मध्ये कसलीही भीती किंवा धाक राहिला नाही असेच म्हणावे लागेल. 
शहरात लक्ष्मीपुरी व्यापार पेठे मध्ये एक अशा व्यापाराचा पोल खोल करण्यात आला आहे. त्याच्या दुकानात लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित माल मिळून आला. या बाबत प्रसार माध्यमातून संबंधित पालिका आरोग्य निरीक्षण मनोज लोटे यांना फोन करून त्या दुकानाच्या समोर बोलावले मात्र त्यांच्या येण्याच्या काही वेळा आदी त्या दुकानदार याने तेथुन पळ काढला. त्याचा पाठलाग करून मनोज लोट यांनी त्याला दुकानातील माल जप्त करण्यासाठी प्रयत्न केले. आणि प्रसार माध्यमाना प्रतिक्रिया दिली. संबंधित इस्टेट अधिकारी यांना ते दुकान सील करण्यासाठी कळवण्यात देखील आले. आरोग्य निरीक्षक मनोज लोट यांनी कोणतीही कारवाई केली नाही.