Awaj India
Register

जाहिरात

 

मटका वाल्याची व्यथा; कार्यकर्त्यांची हप्त्याची कथा

schedule29 Dec 22 person by visibility 219 categoryगुन्हे


कोल्हापूर
मटका वाल्यांच्या विरोधात आंदोलन करायचं आणि त्यांनाच पक्षाच्या आंदोलनाची बॅनरचे गणित घालायचे अशी व्यथा एका मटका वाल्यांनी व्यक्त केली. 

आम्ही व्यवसाय बंद करतो. यांनी आमच्याकडे हप्ते बंद करावेत; अशी मागणी एका मटका व्यवसायिकाने केली.
शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रशासनाला दोष देत अनेक आंदोलनकर्ते
आंदोलन करतात मात्र त्यांचा उद्देश वेगळा असतो अशीच चर्चा शहरात जोरात सुरू आहे. 
 व्यवसायिकांच्यावर धास्ती व्हावी म्हणून हेच आंदोलनकर्ते बातम्या लावा यासाठी अट्टापट्टा करत असतात. आणि दुसरीकडे मात्र हेच सेटलमेंट करण्यासाठी पुढाकार घेत असतात. 
त्यामुळे यांचा नेमका उद्देश काय व्यवसाय बंद करावेत की हप्ते द्यावेत म्हणून ही आंदोलन सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. खरंच सच्चे असतील तर त्यांनी कायमच यासाठी प्रयत्न केला तर मात्र त्यांचे आंदोलन सत्यासाठी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र हप्ते दिले तर आंदोलन बंद करायचा आणि अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू राहायचा असे नको व्हायला अशीही प्रतिक्रिया सर्वसामान्यतून व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes