अमित शहा उपस्थित राहिलेल्या शिक्षण संस्थेकडून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक
schedule25 Aug 23 person by visibility 812 categoryशैक्षणिक
कोल्हापूर आवाज इंडिया
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा उपस्थित राहिलेल्या न्यू एज्युकेशन शिक्षण संस्थेकडून शासनाची लाखो रुपयेची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या शिक्षण संस्थेच्या 13 एकर जागेपैकी 12 एकर जागेवर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार आली आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी असे आदेश सुद्धा आलेले आहेत.
कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन शिक्षण संस्थेकडून विविध शिक्षण संस्था उभा करून शासनाकडून अनुदान लाटले आहे.मुळात या जागा अतिक्रमण केलेल्या असून महानगरपालिका यांनी नोटीसा सुद्धा बजावलेल्या आहेत. काही ठिकाणी बांधकाम सुद्धा थांबवलेले आहे.
बारा एकर जागेपैकी गुरुव समाज, राज्य शासन, गिरी गोसावी, खाजगी मालक यांच्या जागेवर या शिक्षण संस्थेने अतिक्रमण केले आहे.याच शाळेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नीचे
शिक्षण झालेले आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उपस्थितीसुद्धा दाखवली होती. त्यामुळे आपण काहीही करू शकतो असा विश्वास या काही शिक्षण संचालकाकडून होत आहे. अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण याची चौकशी करावी असे आदेश सुद्धा इस्टेट विभागाकडून दिलेले आहेत.
आवाज इंडिया कोल्हापूर