+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule13 Jan 23 person by visibility 147 categoryराजकीय

सचिन जाधव यांनी केला विरोधकांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

कोल्हापूर आवाज इंडिया

गडहिंग्लज शाखेतील ३५ लाख रुपयांचा अपहार,ॲपचा घोटाळा सत्ताधारी पॅनलला पराभवास कारणीभूत ठरणार असल्याचे मत सचिन जाधव यांनी आवाज इंडियाची व्यक्त केले. सभासद कप बशीतून चहा पिऊन विमानाला बाय-बाय करणार असंही जाधव यांनी सांगितले.

 
 कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रचारात सचिन जाधव बोलत होते. या निवडणुकीत जाधव हे राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेतृत्व करत आहेत.

 गडहिंग्लज शाखेकडील लॉकर्समध्ये सुरक्षित होती असे संस्थेचे चेअरमन व कारभारी संचालक सभेत किंवा प्रसिध्दी पत्रकामध्ये जाहिर करत होते. त्यामुळे गडहिंग्लज शाखेमध्ये रक्कम असताना संबंधित रक्कम कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक बँकेत संस्थेच्या खात्यावर जमा केली असलेचे दाखविले आहे. तथापी शिक्षक बँकेची गडहिंग्लज येथेही शाखा आहे. तसेच जिल्हा परिषद सोसायटी व शाखाकडील बहुतांशी कामकाज के. डी. सी. सी. बँकेमार्फत खातेवर / कॅश क्रेडिट खातेवर केले जाते मग 12 लक्ष इतकी मोठी रोख रक्कम गडहिंग्लज येथून कोल्हापूर येथील शिक्षक बँकेच्या मुख्य शाखेत 12 फेब्रुवारी 2022  रोजी रोख भरणा करण्याचे कारणच काय ? तसेच गडहिंग्लज शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक अरुण जाधव यांचे बंधू किरण जाधव यांना त्याच दिवशी 23 लाख रुपये कर्ज हे संस्थेच्या कोल्हापूर येथील मुख्य शाखेमध्ये नियमबाह्यरित्या रोखीने किरण जाधव यांच्या नावे जमा केल्याचे दाखविले आहे. असेही जाधव यांनी सांगितले.