विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी या आघाडीने जोरदार मुसंडी
schedule12 Jan 23 person by visibility 153 categoryराजकीय

कोल्हापूर :आवाज इंडिया
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी या आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.प्रत्येक सभासदापर्यंत बदल घडवायचा असा निरोप देतसत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला थारा न देण्यासाठी बदल घडवण्याचे आव्हान केले आहे.
पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला त्यांच्यासमोर शाहू स्वाभिमानी आघाडीचा अजेंडा मांडला. तसेच सभासदाच्या वेगवेगळ्या योजना राबवू अशी ग्वाही दिली.
शाहू स्वाभिमानी आघाडीने आजरा, गडहिंग्लज, चंदगड गगनबावडा या पाच तालुक्याचा दौरा एकाच दिवशी केला.
शाहू स्वाभिमानी आघाडीचे मार्गदर्शक ए.व्ही. कांबळे, रमेश सातपुते, एस.ए.गायकवाड, सचिन मगर यांच्यासह उमेदवार व समर्थकांनी गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील सभासद मतदारांच्यापर्यंत पोहोचून आघाडीला निवडून देण्याविषयी आवाहन केले. पॅनल प्रमुख सचिन जाधव, मार्गदर्शक प्रकाश देसाई, अतुल कारंडे यांच्यासह उमेदवार आणि व समर्थकांनी सत्ताधारी आघाडीच्या कामकाजाचा पंचनामा केला.