यावर्षीचा छत्रपती शाहू राजे समता पुरस्कार प्रोफेसर बसवंत पाटील यांना जाहीर
schedule22 Jun 24 person by visibility 881 categoryसामाजिक
कोल्हापूर ;
कालकथित माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर (रजि)* यांच्यावतीने देण्यात येणारा छत्रपती शाहू राजे समता पुरस्कार प्रोफेसर बसवंत पाटील यांना जाहीर करण्यात आला.
रविवारी ( दि.23 ) दुपारी दोन वाजता आमदार ऋतुराज पाटील, जयवंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
प्रा. बसवंत मल्लाप्पा पाटील यांनी गौतमीज यश क्लासेस , कसबा बावडाच्या माध्यमातून सन 2003 ते आजतागायत ई 8वी 9वी 10वी व 12वी विद्यार्थ्यांना व MPSC /UPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्लासेस खाजगी असले तरी कधीच व्यवसायिक दृष्टीने विचार न करता सामाजिक दृष्टिकोनातून गेली 22 वर्षे सेवा देण्याचे कार्य अविरत पणे चालू आहे . राजर्षि शाहू महाराज यांचा शैक्षणिक,सामाजिक , कृषीविषयक , सांस्कृतिक कार्याचा वारसा आणि वसा जपण्यासाठी गौराई फौंडेशन (रजि.) या सामाजिक ट्रस्टची 21 ऑक्टोबर, 2011 रोजी कायदेशीर प्रक्रियेतुन स्थापना केली.
पाटील यांचे जन्मगाव चिंचणे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप .लेझीम साहित्य, वारकरी मंडळ , चिंचणे यांना सुरपेटी (हार्मोनियम ) तसेच अनेक सेवा भावी संस्थाना आर्थिक मदत, जीवन कल्याण प्राथमिक शाळेत LED T V सेट प्रदान, गोर गरीब कुटुंबातील ई 10वी च्या वर्गातील 5 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत.
पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी सन1993पासून आजतागायत प्रयत्नशील आहेत.या करिता मोर्चा , उपोषण , धरणे , या सारख्या रस्त्यावरील लढयात सक्रिय सहभाग घेतला आहे. चिंचणे व कामेवाडी या आदिवासी ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या पेसा कायद्यात समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालया पर्यंत न्यायालयीन लढा . महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 354 आदिवासी महादेव कोळी कुटुंबांना खावटी अनुदान मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींकरिता राबवण्यात आलेल्या दुधाळ जनावरे गट योजने चा 18 आदिवासी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात यशस्वी झाले.
वर्ष 2020 - 21 व 2022- 23या वर्षात ठक्कर बाप गट समूह योजने च्या माध्यमातून अनुक्रमे 79 लाख व 60 लाख निधीचे तरतूद व विनियोग करण्यात यशस्वी,कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठी अद्यापही प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर संघर्ष सुरू आहे .
पाटील सध्या कार्यरत विविध संस्था व संघटनामध्ये स्विकारलेले पदभार :
1) संस्थापक व अध्यक्ष ,गौराई फौंडेशन ,कोल्हापूर .
2)संस्थापक व सल्लागार आदिवासी कला , क्रिडा व संस्कृती विकास मंडळ , चिंचणे , ता चंदगड
3) संचालक , जिल्हा कार्यकारिणी ,कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ
4) संस्थापक सदस्य , आदिवासी कोळी समाज समन्वय संघटना , महाराष्ट्र राज्य .
5) सक्रिय सदस्य , राजर्षि शाहू सलोखा मंच , कोल्हापूर
6) जिल्हाध्यक्ष ,कोल्हापूर , अखिल भारतीय कोळी समाज , नवी दिल्ली ,
शाखा : महाराष्ट्र प्रदेश
7) विभागीय अध्यक्ष ,पश्चिम महाराष्ट्र विभाग , आदिवासी संघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य
8) संचालक , कोल्हापूर जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन .
9) विभागीय अध्यक्ष ,पश्चिम महाराष्ट्र विभाग तथा कोअर सदस्य , राज्य कार्यकारिणी , प्रोफेशनल टीचर असोसिएशन , महाराष्ट्र राज्य .
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे.