Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

कोल्हापुरात रंगणार "लोकनाथ चषक" भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार

schedule07 Feb 23 person by visibility 194 category


*बाळासाहेबांची शिवसेना आयोजित "लोकनाथ चषक" क्रिकेट स्पर्धेचा लोगो अनावरण* 

कोल्हापूर दि.०५ : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा बावडा विभागातर्फे "लोकनाथ चषक" भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सोहळा दि.२० फेब्रुवारी रोजी प्रकाश झोतात खेळविला जाणार आहे. या स्पर्धेकरिता विजेता संघास प्रथम पारितोषिक रोख रु.९९,९९९/- आणि "लोकनाथ चषक" दिला जाणार आहे. उपविजेता संघास रोख रु.४९,९९९/- आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी रु.९,९९९/- असे बक्षीस देण्यात येणार आहे. यासह मॅन ऑफ द सेरीज साठी "सायकल", स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजास "क्रिकेट बॅट", उत्कृष्ट गोलंदाजास "स्पोर्ट्स शूज", उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास "क्रिकेट कीट", अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी "स्मार्ट वॉच" सह सलग तीन षटकार, प्रथम हॅट्रिक साठी आकर्षक बक्षिसे अशी वैयक्तिक भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रक्षेकांनाही आकर्षक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा लोगो अनावरण सोहळा आज कसबा बावडा येथील भगवा चौकात पार पडले. एकनाथ चषक लोगो कटआउट द्वारे या स्पर्धेचे लोगो अनावरण करण्यात आले. या स्पर्धेकरिता इच्छुक संघांनी नावनोंदणी साठी शिवनेरी शिवसेना विभागीय संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

            "लोकनाथ चषक" भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या लोगो अनावरण सोहळ्यास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण,युवानेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्वयक सुनील जाधव, महिलाआघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, संघटिका श्रीमती मीनाताई पोतदार, रुपाली कवाळे, सुनिता भोपळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, युवासेना जिल्हा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, उपशहरप्रमुख रोहन उलपे, विभागप्रमुख धवल मोहिते, विराज खाडे, सुरज सुतार, उत्तम रंगापुरे, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, राकेश चव्हाण, सचिन पाटील, अभिजित केंबळे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.        

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes