+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा - अमल महाडिक adjustरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) कोल्हापुर शहर कार्यालयास सदिच्छा भेंट adjustनॅशनल बँक पॅंथर पार्टीचा रविवारी मेळावा adjust*डॉ. संजय डी. पाटील यांचा* *' नवरत्न'पुरस्काराने सन्मान* adjustजागतिक ओझोन दिन adjustराजारामपुरीत साकारणार भव्य तिरूपती बालाजी अवतार देखावा adjust डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ने सन्मान adjust१६०० मतांचा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा - अमल महाडिक adjust दि एज्युकेशन सोसायटीचे अनिधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश adjustयांना मिळाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार
schedule09 Nov 22 person by visibility 130 categoryशैक्षणिकशैक्षणिक


कसबा बावडा
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ अभिनंद पाटील यांचा "इंडिया एक्सलन्स अवॉर्ड-2022" ने सन्मानित करण्यात आले. बेंगळुरू येथील हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

   संशोधन, चित्रपट, प्रसार माध्यमे आणि ब्रँडिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'ब्लाइंडविक' या संस्थेकडून इंडिया एक्सलन्स अवॉर्डने सन्मान केला जातो. डॉ अभिनंदन पाटील हे गेली 11 वर्षे संशोधन व समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. मोबाईल व टीव्हीच्या व्यसनापासून मुलांना मुक्त करण्यासाठी ते समुपदेशन करतात. त्यासाठी पेटंटेड प्रॉडक्टचा वापर करून अभ्यास व परीक्षेची भीती दूर करून एकाग्रता वाढविण्यासाठी ते मदत करतात. त्याचबरोबर कर्करोग निदान व उपचार याबाबतही ते काम करत आहे. या क्षेत्रातील संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ अभिनंदन पाटील यांच्या या कामाची दखल घेऊन 'यंग इंस्पायरिंग इंटरनॅशनल एज्युएकेटर अँड कॅन्सर सायंटिस्ट ' म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

  डॉ. पाटील यांनी बी. फार्म, एम. फार्म, पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रमात गोल्ड मेडल मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' व 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.

    डॉ. अभिनंद पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बेंगळुर- अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या हस्ते 'इंडिया एक्सलन्स अवॉर्ड' स्वीकारताना डॉ अभिनंदन पाटील.