महाराष्ट्र चेंबर तर्फे आज इचलकरंजीत निर्यातक्षम व्यापार उद्योग परिषद - ललित गांधी
schedule06 Jul 23 person by visibility 434 categoryउद्योग

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री तर्फे शुक्रवारी सात जुलै रोजी निर्यात व्यापार उद्योग परिषद इचलकरंजी येथे होत आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन धूत, को चेअरमन मयूर शहा यांनी दिली.
अधिक माहिती देताना ललित गांधी म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही परिषद होईल यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवसायातील तज्ञ मार्गदर्शक सल्लागार प्रशिक्षक मिहीर अजित शहा मार्गदर्शन करतील.