टोप हायस्कूल टोप मध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष प्रारंभ
schedule11 Dec 24 person by visibility 188 categoryक्रीडा
टोप हायस्कूल टोप मध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष प्रारंभ
शिवराज एज्युकेशन सोसायटी चे टोप हायस्कूल टोप या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमागदार सोहळ्याच्या रूपाने करण्यात आले.महोत्सवाचे उद्घाटन नूतन आमदार अशोकराव माने बापू, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मगदूम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व आकाशात फुगे सोडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक के.बी पाटील सर यांनी केले. विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ संस्कार लोखंडे व एच एस.पोवार यांनी दिली..जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा अडसूळ यांनी उद्घाटन सोहळ्याचे कौतुक करून जीवनातील खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्य शोधून ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही या निमित्ताने दिली.. पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रीय खेळाडू महेश मगदूम यांनी शालेय जीवनात खेळ व अभ्यास यांची सांगड घालत भविष्याचा वेध कसा घ्यावयाचा याचा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना दिला.. तर आपल्या अध्यक्षीय मनोगत आतून विद्यमान आमदार अशोकराव माने बापू यांना हातकणंगले तालुक्याचा क्रीडा संकुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही या निमित्ताने दिली तसेच जिद्द व चिकाटी , बाळगले तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.आर.पाटील व एस.व्ही.कांबळे यांनी केले . याप्रसंगी शिवराज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम.टी. पाटील भाऊ, नृत्य व नाट्य दिग्दर्शक उमेश चौगुले माननीय पंचायत समिती सभापती डॉक्टर प्रदीप पाटील आबा संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील,लक्ष्मण भोसले, कार्याध्यक्ष दौलत पाटील, आनंद भोसले संचालक सुरेश पाटील ,पोपट पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका एस.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक एच.एस. पोवार यांनी विद्यालयातील क्रीडा प्रतिनिधींच्या सहित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले..