+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule14 Jun 24 person by visibility 122 category
       
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना*
          
*जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुलधारक व प्रशासनाची बैठक*
           
*दीड महिन्यात ड्रोनद्वारे सिटीसर्वे होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड*          
                  
*कोल्हापूर, दि. १४: सेनापती कापशी ता. कागल येथील ५६६ ग्रामस्थांची घरे शेतीच्या सातबारामध्ये बांधलेली आहेत. गेल्या ५० वर्षात सिटी सर्वे झालेला नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण, तारण, वारसा नोंदी, खरेदी -विक्री, डागडुजी करताना अडचणी येतात. या सर्व घरकुलधारकांचा तातडीने सिटीसर्वे करून प्रॉपर्टी कार्ड द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.*   
             
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री श्री . मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत घरकुलधारक व प्रशासनाची बैठक झाली.
           
    याबाबत अधिक माहिती अशी, विस्तारणाऱ्या सेनापती कापशी या मोठ्या गावामध्ये मुख्य गावठाणासह आजूबाजूला वाड्या- वस्त्यांवर जोडणारे रस्ते आहेत. त्यामुळे, ग्रामस्थांनी सोयीनुसार शेतीमध्ये सातबारा उताऱ्यात घरे बांधलेली आहेत. गेल्या ५० वर्षात सिटी सर्वे झाला नाही. दोनवेळा गावठाण हद्दवाढ होऊनही ही घरकुले गावठाणाबाहेरच राहिली. परिणामी प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे या घर मालकांना अनेक अडचणी येत आहेत.
            
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, रविवारी दि. १६ जून रोजी लगतच्या नंबरचा सर्वे करा. सोमवारी दि. १७ जून रोजी ग्रामपंचायतीचे अनुषंगिक ठराव गोळा करा. मंगळवारी दि. १८ जून रोजी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा . एक आठवड्याच्या आत प्रस्ताव मंजूर करून महिना ते दीड महिन्याच्या आत ड्रोनद्वारे सिटीसर्वे करुन प्रॉपर्टी कार्ड दिली जातील, असे नियोजन करा.
             
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, सरपंच उज्वला कांबळे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, सुनील चौगुले, उपसरपंच सौरभ नाईक, सुनील चौगुले, प्रवीण नायकवडी, इसाक मकानदार, सूर्यकांत भोसले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
     *****