Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम

schedule03 Jun 23 person by visibility 89 category


"शिवालय" भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे नियोजन

कोल्हापूर : 50 वर्षाची परंपरा लाभलेल्या "शिवालय" भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत* ऐतिहासिक खासबाग चौक, येथे *३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा* भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. *आमच्या कैलासगडची स्वारी मंदिराच्या 'शिवालय' भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्यभिषेकास जाण्याची परंपरा गेल्या ५० वर्षे सुरू आहे. ३२५ वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर शिवशाहीर राजु राऊत यांचे समवेत साजरा केला होता. 333 वा शिवराज्यभिषेकदिन मंडळातर्फे खासबाग येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. या परंपरेत यावर्षी ३५० वा आणि शिवालय भजनी मंडळाच्या परंपरेचा सुवर्ण महोत्सवी शिवराज्यभिषेकदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भव्य दरबार हॉल हा मोठा ऐतिहासीक सेट उभा करण्यात येणार असून दर्शनी भव्य प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असेल. शिवराज्यभिषेकदिन निमित्त रविवार ते मंगळवार दिनांक ४,५,६, जून २०२३, या तीन दिवसांमध्ये पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  
*रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व राजदरबारचे उदघाटन माननीय युवराज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व माननीय चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली, माननीय युवा उद्योजक, सत्यजित चंद्रकांत जाधव, सचिव-महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी औध्योगिक सेल, मा. संभाजी जाधव (मा. नगरसेवक राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ) मा. संजय पोवार (जिल्हाप्रमुख शिवसेना,) मा. विजयराव देवणे (जिल्हाप्रमुख शिवसेना.)मा. विनायक साळोखे (माजी जिल्हाप्रमुख शिवसेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.* व सायंकाळी ७ ते १० या वेळेत *धर्मवीर संभाजी राजे (लोककला शाहीरी पथक) शाहीर संजय जाधव (मिणचेकर)* यांचा पोवाडाचे आयोजन केले आहे. *सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता भागातील महिलांचा कुंकूमार्चन सोहळा* हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी *माननीय श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती व माननीय आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तसेच मा. सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, मा. सौ.डॉ. दश्मिता सत्यजित जाधव ( अध्यक्षा जयश्री चंद्रकांत ( आण्णा) जाधव फाउंडेशन) यांच्या हस्ते* या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी भागातील सर्व महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच ७ ते ८ या वेळेत मर्दानी खेळाच्या आखाड्याचे पूजन व शुभारंभ माननीय सत्यजित उर्फ नाना कदम व मा.पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे.* त्या नंतर रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये शिवरायांच्या वरील चित्रफित दाखवण्यात येणार आहे. 
मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता करवीर पिठाचे जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य महाराज तसेच कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री बबेराव शंकरराव जाधव यांच्या हस्ते दत्तोबा बारड, बाळासाहेब देसाई, व मान्यवरांचे उपस्थितीत विधीवत शिवप्रतिमीचे पूजन* करून ३५०वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व भागातील शिवभक्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवरायांचा जयघोष व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 
*सायंकाळी ६-३० वाजता माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व मान. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ऋतुराज संजय पाटील, तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आमच्या शिवालय भजनी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बाळासाहेब पोवार, श्री प्रदीप रणदिवे, श्री दिलीप नामदेव जाधव, भागातील शिवभक्त, महिला व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेच्या पूजनाचा सोहळा मान्यवरांचे हस्ते होईल मान्यवरांचे स्वागत, भाषणे व त्यानंतर भव्य आतिशबाजी होईल* व रात्री ९ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम व प्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
यावेळी अध्यक्ष प्रदीप साठे, उपाध्यक्ष विवेक कोरडे, विलास गौड, खजानिस किशोर भोसले, शाहीर अजित आयरेकर, बाबासो शिंदे, अजित जाधव, राजू जाधव, रोहित कारंडे, बबन कांबळे, राजू काटे, अनिल गौड आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes