कृती फौंडेशन यांच्यावतीनेे त्यांना 'आदर्श क्रांतीबा ज्योतिबा फुले शिक्षक' पुरस्कार
कोल्हापूर ;
आपली शाळा आपला वर्ग आपले विद्यार्थी गुणसंपन्न असावे म्हणून शिक्षक कार्यरत असतात. हेच शिक्षक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला संविधानाने हक्क आणि अधिकार दिले आहेत म्हणून संविधान विचारमंचच्या माध्यमातून सुद्धा प्रचार प्रसार करत असतात. यापैकीच एक शिक्षक म्हणजे राजर्षी शाहू विद्यालय फुलेवाडी (ता.करवीर) येथील विनोद मारुती कांबळे होय.
दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्यासह स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्याचं काम विनोद कांबळे यांनी केला आहे. घोटवडे (ता. पन्हाळा) या गावापासून त्यांच्या शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली . आई-वडीलांनी मोलमजुरी करून मुलांना शिक्षण दिले. याची जाणीव ठेवत विनोद कांबळे समाजातील इतर मुलांना सुद्धा मार्गदर्शन व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. नोकरीबरोबर सुट्टीचा प्रत्येक दिवस त्यांनी समाजकार्यासाठी झोकून दिलेला आहे.
भारतीय बौद्ध महासभायांच्या वतीने सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कृती फौंडेशन यांच्यावतीनेे त्यांना 'आदर्श क्रांतीबा ज्योतिबा फुले शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी (1 सप्टेंबर) शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.