+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule03 May 23 person by visibility 111 categoryराजकीय

कोल्हापूर
जयसिंगपूर येथील सि.स. नंबर 1251 येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली काढण्यात आली. निळे झेंडे घेत बाबासाहेबांचा जयजयकार करत रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर,बसंत -बहार रोड या मार्गाहून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आली.

हजारोच्या संख्येने उपस्थितीत आंबेडकरीप्रेमी नागरिकांनी रॅलीला सुरुवात दसरा चौकातून केली. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

 बाबासाहेबांचा जयजयकार करत, पूतळा त्याच ठिकाणी झाला पाहिजे अशा घोषणानी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा समिती जयसिंगपूर यांचे निवेदन स्वीकारले. नागरिकांनी संविधानाचा मान राखत शांतता निर्माण करावी, असे आव्हान त्यांनी केले.

सि.स.स नंबर 1266 येथे घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा,या जागेतील सार्वजनिक मुतारी काढण्यात येऊ नये, तिचे संरक्षण करण्यात यावे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुतळ्यासाठी सिस नंबर 1266 मध्ये 250 चौरस मीटर जागा पत्राद्वारे देण्यात आली आहे या पत्राची खाते निहाय चौकशी करण्यात यावी,त्या जागेचे रेडीरेकेनरच्या दराने चलन भरले असल्यास त्याची चलन पावती देण्यात यावी,आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.


यावेळी निमंत्रक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, संघटक पुतळा समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे,
संघटक कैलास काळे, उपाध्यक्ष आदमभाई मुजावर, कार्याध्यक्ष श्रीपती सावंत, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती सासणे, उपाध्यक्ष साजिदा घोरी, 
सचिव मनीषा पवार, युवा आघाडीचे विश्वजीत कांबळे, उपाध्यक्ष अमित वाघवेकर, सचिव सचिन कांबळे, प्रवीण शिंदे, बाजीराव नाईक, प्रदीप पेरणे, सतीश भंडारे, सुरेश कांबळे, आकाश कुरणे, अरविंद धरणगुत्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते.