+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule19 Apr 23 person by visibility 100 categoryराजकीय
कोल्हापूर :

राजाराम कारखाना निवडणूकीत सत्तारुढ सहकार आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुई गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक
यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीला पाठिंबा जाहीर केला. हातकणंगले तालुक्यातील सर्व आवाडेप्रेमी कार्यकर्ते आणि जवाहर कारखान्याचे सर्व संचालक सहकार आघाडीच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करतील अशी ग्वाही राहुल आवाडे यांनी दिली. आम्ही सहकार टिकवणाऱ्या लोकांपैकी आहोत. त्यामूळे राजाराम कारखाना सहकारी राहायचा असेल तर तो महादेवराव महाडिक यांच्या पंखाखालीच राहिला पाहिजे. ज्यांनी स्वतःचा सहकारी कारखाना खाजगी केला त्यांनी राजारामवर नजर ठेवू नये असा टोला आवाडे यांनी लगावला. कोणतीही उपपदार्थ निर्मिती नसताना राजाराम कारखान्याने जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला हे दुर्मिळ उदाहरण आहे अशा शब्दात त्यांनी महादेवराव महाडिक यांच्या पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभाराचे कौतुक केले. जिल्ह्यात सहकार रुजवणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये महाडिक यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल असेही आवाडे म्हणाले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गावचा सरपंच शब्द पाळतो पण तुम्हाला मंत्री होऊनही शब्द पाळता आला नाही. राजकारणामध्ये शब्दाला महत्त्व आहे.जो शब्द पाळत नाही त्याची राजकीय कारकीर्द लवकरच संपुष्टात येते अशा शब्दात खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. बंटी पाटील यांच्या खुनशी राजकारणाची लवकरच अखेर होईल असे भाकीत महाडिक यांनी वर्तवले. यावेळी आघाडीचे उमेदवार संजय मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रुईच्या सरपंच शकीला कोनुरे , उपसरपंच अश्विनी पवार, वसंतराव बेनाडे, अभय काश्मिरे, सुधीर पाटील, जितेंद्र ऐतवडे, प्रकाश पाटील, राजाभाऊ देसाई,आनंदा तोडकर यांच्यासह सभासद शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.