+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात रंगणार "लोकनाथ चषक" भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार adjust कुंभी कासारी आणि नरके पॅनल याची विश्वासार्हताच पॅनलला विजयी करेल adjustसभासदांच्या विश्वासामुळे नरके पॅनलच्या विजय निश्चित adjust**कोल्हापुरात 2 फेब्रुवारीला "संघर्ष" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा adjust भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस पाटलाला मारहाण adjustपशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात भरघोस वाढ. adjustरोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन adjust.. कोल्हापुरातील मटका पोलिसांच्या ब्रँडच्या काळ्या गॉगल मधून दिसणार काय adjustपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२३* या प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ adjustइंडियन डेअरी फेस्टिवलचे शुक्रवारी उद्घाटन
schedule17 Jul 22 person by visibility 3551 categoryराजकीय
कोल्हापूर/मारुती फाळके
       आम्ही सभासदांना जाहीरनामा नव्हे तर वचननामा दिला आहे. हा वचननामा येत्या पाच वर्षात पूर्ण केला जाईल असा विश्वास राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे सुकाणू समिती प्रमुख जोतीराम पाटील यांनी व्यक्त केला.
      शिक्षक बँकेच्या करवीर शाखेतील प्रवेशावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,सभासदांनी मोठ्या विश्वासाने शाहू आघाडीला निवडून दिले आहे .या विश्वासाला पात्र राहून पुढील पाच वर्ष आमचे संचालक कामकाज करतील. सभासद हिताला प्राधान्य देऊन बँकेच्या उन्नतीसाठी झटतील आणि वचननाम्यामध्ये दिलेल्या शब्दांची पूर्तता करतील. शिक्षक बँकेला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक बनवण्याचा आमचा मनोदय असून यामध्ये करवीर शाखा आपला सिंहाचा वाटा उचलेल.
 यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे म्हणाले, सभासदांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवून सत्ता दिली आहे. सभासदांच्या या विश्वासाला जागून आपण बँकेला प्रगतीपथावर न्यावे.


      करवीर शाखेचा प्रवेश देखण्या पद्धतीने झाला. यावेळी सजावट ,हार तुरे,अल्पोपहार तसेच अनुषंगिक बाबीवर होणारा सर्व खर्च हा करवीर संचालकांनी केला.शाखेवर कोणताही खर्च बसविला नाही यातून काटकसरीच्या कारभाराची चुणूक दाखवली . यावेळी उपस्थित सर्व सभासदांना संचालकांच्या वतीने कृतज्ञता भेट म्हणून कप बशी देण्यात आली.
     करवीर तालुका संचालक एस व्ही पाटील म्हणाले ,अत्यंत काटकसरीने व पारदर्शक कारभार करून सभासदांची आर्थिक उन्नती साधने हेच आमचं ध्येय असेल. या पुढील कालखंडात अशीच वाटचाल आम्ही करू.
      बँक संचालक सुरेश कोळी म्हणाले सर्वांच्या एकजुटीमुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे .करवीर तालुक्याचे या विजयात मोठे योगदान आहे त्यामुळे करवीर शाखेत येणारा प्रत्येक सभासद हा समाधानानेच बाहेर पडेल अशी विनम्र सेवा कर्मचाऱ्यांनी द्यावी .संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी सभासदांनी केलेल्या सूचनांचा नेहमीच आदर केला जाईल. आम्ही विश्वस्त आहोत खरे संचालक हे सामान्य सभासदच आहेत.
 यावेळी आकाशवाणी कलाकार डी एस कौशल यांनी बँक प्रवेशावर आधारित गीत सादर केले त्याला सभासदांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रा.मधुकर पाटील ,सुभाष चौगले यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत गौतम वर्धन, सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले आभार व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे यांनी मानले
     या कार्यक्रमाला सुनील पाटील ए के पाटील विलास चौगुले बाळासाहेब पवार रघुनाथ खोत बाजीराव पाटील राजीव परीट चेअरमन अर्जुन पाटील व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे संचालक वर्षा केनवडे ,सुनील एडके, बाळासाहेब निंबाळकर शिवाजी रोडे पाटील ,हरिदास वर्णे,चंद्रकांत पाटील ,आदी उपस्थित होते