.. कोल्हापुरातील मटका पोलिसांच्या ब्रँडच्या काळ्या गॉगल मधून दिसणार काय
schedule28 Jan 23 person by visibility 127 categoryगुन्हे

कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
कोल्हापूर शहरात पुन्हा मटका जोरात सुरू आहे. महाविद्यालयीन तरुणासह सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा या जाळ्यात अडकवण्याचे काम मटका चालक करत आहेत. सर्वसामान्यांना उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा मटका पोलिसांच्या काळ्या ब्रँडच्या गॉगलमधून दिसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैधरित्या हा व्यवसाय सुरू असताना सुद्धा काही पोलिसांच्या हप्त्यावर त्यांना परवानगी मिळाली आहे.
अवैध व्यवसायाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की व्यवसाय अन्य मार्गाने केला जात आहे. छापा टाकून पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात ; मात्र दुसऱ्या दिवसापासून मटका सुरूच असतो. दोन दोन चिट्ट्या घेऊन मटका खेळणारे ग्राहक फिरून हेरले जातात.
शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या व्यवसायाला जोरात तेजी आहे. यासह कोल्हापूर शहरात मुख्य रस्त्यावर पानपट्टी बोळातून फिरता मटका ही जोरात सुरू आहे. हे अवैध व्यवसायिक राजकारणी लोकांना हे अवैध व्यावसायिक राजकारणी लोकांना आर्थिक सहाय्य करत असल्यामुळे या व्यवसायाला बळ मिळत आहेत.
किरकोळ कामगिरीला यश मिळवत पोलीस बक्षीस घेतात मात्र याच पोलिसांच्या हद्दीत असणारा व्यवसाय बघून यांना बक्षीस कसं दिले जातं याबाबत ही शंका व्यक्त केली जात आहे.
बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यामुळे कमी वेळेत जास्त पैसा मिळावा म्हणून या व्यवसायाकडे सुद्धा तरुण ओढले जात असल्याची उदाहरणे आहेत. ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना अशी अवस्था तरुणांची झाली आहे.