+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule19 Jul 20 person by visibility 530 categoryसंपादकीय

जेव्हाही आपल्या घरी कुठल्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सर्व कुटुंबाचं लक्ष केवळ एकाच गोष्टीकडे लागून असते की, त्या बाळाच नाव काय ठेवायचं. कारण कुणाचंही नाव हे अतिशय महत्वाचं असतं कारण ते नाव त्या व्यक्तीची ओळखं असते. म्हणूनच कुठलीही व्यक्तीअसो, गोष्ट वा ठिकाण त्याला काही ना काही महत्व आणि अर्थ हा असतोच. तुम्ही कधी आपल्या देशातील राज्यांच्या नावावर लक्ष दिले आहे का? आपल्या देशातील राज्यांची नवे देखील अशीच अर्थपूर्ण आहेत. त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही अर्थ हा लपलेला आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

मध्य प्रदेश :

मध्यप्रदेश राज्य, या राज्याच्या नावामागे अगदी सिम्पल लॉजिक आहे. हे क्षेत्र भारताच्या मध्यभागी आहे म्हणून याला मध्यप्रदेश हे नाव देण्यात आले.

छत्तीसगड :

छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशातून विभक्त होऊन तयार झाले आहे. येथील ३६ ऐतिहासिक किल्ल्यांमुळे या क्षेत्राला छत्तीसगड हे नाव पडले.

झारखंड :

संस्कृत भाषेतझारह्याचा अर्थजंगलअसा होतो तरखंडम्हणजे जमीन. ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत म्हणून या क्षेत्राला झारखंड असे नाव देण्यात आले.

उत्तर प्रदेश :

उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या उत्तर भागात आहे, त्यामुळे या क्षेत्राला उत्तरप्रदेश असे नाव देण्यात आले.

उत्तराखंड :

२००० साली उत्तर प्रदेशातून विभक्त होऊन उत्तराखंड या राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड ह्याचा अर्थउत्तरेकडील जमीनअसा होतो.

बिहार :

बिहार या राज्याचं नाव संस्कृत शब्दविहारह्यावरून पडले. ह्याचा अर्थरहाणे’. या क्षेत्रात आधी बौद्ध भिख्खू राहायचे, यावरून या क्षेत्राला बिहार असे नाव मिळाले.

गोवा :

गोव्याचं नाव हे संस्कृत शब्दगौम्हणजेच गाय ह्यावरून पडले आहे असे काही लोक मानतात. तर काही लोक अस मानतात की, हे नावयुरोपीय किंवा पोर्तुगाली या भाषेतून आले आहे.

महाराष्ट्र :

मे १९६० साली महाराष्ट्र ह्या राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे नाव दोन संस्कृत शब्दांची जोड आहे. ज्यातमहाम्हणजे महान, महाराष्ट्र म्हणजेमहान राष्ट्र’.

ओडिशा :

ओडिशा हे नाव संस्कृत शब्दओड्र विश्यकिंवाओड्र देशह्या शब्दापासून घेण्यात आले आहे. हा शब्द मध्य भारतात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो.

तामिळनाडु :

तामिळ ह्या शब्दाचा अर्थ गोड आणि नाडू म्हणजे देश. या दोन शब्दांना मिळून तामिळनाडू हा शब्द बनला आहे.

कर्नाटक :

कर्नाटक हा शब्द संस्कृत मधीलकारूआणिनादया दोन शब्दांची जोड आहे. ज्याचा अर्थउन्नत भूमीअसा आहे.

केरळ :

केरलमहा शब्द चेरा साम्राज्यातून आला आहे, ज्याने ते व्या शतकापर्यंत या राज्यावर राज्य केलं. याशिवाय संस्कृतमध्ये केरलमम्हणजे जोडलेली जमीन असा होतो.

जम्मू काश्मीर :

जम्मूहा शब्द येथील राजा जंबू लोचन या वरून घेण्यात आला आहे, तर काश्मीर हा शब्दकाआणिशिमिरा’ यांची जोड आहे. ज्याचा अर्थसुकलेलं पाणीअसा होतो.

हिमाचल प्रदेश :

संस्कृतमध्येहिम’ या शब्दाचा अर्थबर्फतरअचलया शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. या दोन शब्दांना मिळूनहिमाचलहा शब्द बनला आहे.

हरियाणा :

हरियाणाहा शब्दहरिआणिआनाया दोन शब्दांपासून बनला आहे. ह्यातहरिम्हणजेच विष्णू भगवान आणिआनाम्हणजे आगमन’. असं म्हणतात की महाभारता दरम्यान भगवान विष्णू येथे आले होते म्हणून या क्षेत्राचं नाव हे हरियाणा असे पडले.

राजस्थान :

राजस्थान हे स्थान आधी राजांच्या राहायचे ठिकाण असायचे. ज्यामुळे या ठिकाणाचे नाव राजस्थान असं पडलं. या आधी या ठिकाणाचे नाव हे राजपुताना असं होतं.

गुजरात :

या क्षेत्राचे नावगुजरायांच्या नावावर पडले आहे. ज्यांनी अठराव्या शतकात येथे राज्य केले होते.

पंजाब :

पंजाब या शब्दाचा अर्थपाच नद्यांची जमीनअसा होतो. हा शब्द इंडो-इरानी शब्द पुंज म्हणजेचपाचआणिआबम्हणजेच पाणी यांच्या एकत्रीकरणातून बनला आहे.

पश्चिम बंगाल :

बंगाल हा शब्द संस्कृतमधीलवंगाह्या शब्दापासून बनला आहे. यालाच पुढे जाऊन फारसी भाषेतबंगालहआणि हिंदीतबंगालतर,बंगाली भाषेतबांग्लाअसे म्हटले जाऊ लागले.

आसाम :

आसाम हा एक इंडो-आर्यन शब्द असल्याचं मानले जाते, ज्याचा अर्थअसमानअसा आहे. तर काही लोकांच्या मते या क्षेत्राचं नाव हे इथे राज्य करणाऱ्या अहोम शासकांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

सिक्किम :

सिक्किम या क्षेत्राचं नाव हे देखील दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनले आहे. यातीलसुम्हणजे नवीन आणिख्यिमम्हणजेमहलअसा अर्थ होतो.

अरुणाचल प्रदेश :

संस्कृतमध्येअरुणाम्हणजेसकाळची किरणेआणिअचलम्हणजेपर्वतअसा अर्थ आहे. हे दोन शब्द मिळूनचअरुणाचलप्रदेश नाव पडले आहे.

मणिपुर :

मणिपूर या शब्दांचा अर्थरत्नांची जमीन

मेघालय :

संस्कृतमध्येमेघम्हणजेढगआणिआलयम्हणजेआवास’, या दोघांना मिळूनमेघालयअसं नाव पडलं आहे.

मिझोराम :

मिझोरामह्या शब्दातीलमिम्हणजे लोक, ‘झोम्हणजे पहाड. या दोन शब्दांपासून मिझोराम हा शब्द बनला आहे.

त्रिपुरा :

एका कथेनुसार ह्या राज्याचे नाव येथीलत्रिपुर राजा’ यांच्या नावावरून पडले आहे. हे भारतातील तिसरं सर्वात छोटं राज्य आहे.

नागालँड :

नागालँड म्हणजे नागांची जमीन असा या शब्दाचा अर्थ होतो.

आंध्र प्रदेश :

संस्कृत भाषेतआंध्रम्हणजेदक्षिण’, तसेच येथे राहणाऱ्या एका जातीचे नाव देखीलआंध्रआहे. यामुळेच या क्षेत्राचं नाव हे आंध्रप्रदेश असे पडले आहे.

तेलंगणा :

तेलंगणा या राज्याची निर्मिती जून २०१४ साली झाली. आंध्र प्रदेशातून विभक्त होऊन हे नवीन राज्य तयार झाले. तेलंगणा या राज्याचे नाव देखील दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झाला आहे, हा शब्द तेलगु आणि अंगाना ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. याचा अर्थम्हणजे जिथे तेलगु बोलली जाते.

तर हे होते आपल्या देशातील २९ राष्ट्रांच्या नावांमागील लॉजिक.