नग्न पूजा करणाऱ्या बाबावर कारवाई होणार काय
schedule03 Jun 23 person by visibility 432 category

कोल्हापूर ; (आवाज इंडिया विशेष प्रतिनिधी)
बाबाचे कारनामे सांगली पासून कोकणा पर्यंत तर कराड पासून सीमाभागा पर्यंत पसरले आहेत. बाबाचे एकच टार्गेट श्रीमंत महिला आणि तरुण पोरी. बाबाचं वय फक्त 45 आहे. मात्र कारनामे एखाद्या 22 वर्षीय तरुणाला लाजवेल असे आहेत.
बाबाची नजर म्हणजे जणू एक्सरे मशीन
बाबाच्या भीरभीरणाऱ्या, चोरट्या नजरेतून कोणीही सुटू शकत नाही. समोर बसलेल्या बाईच्या छातीवर आणि शरीरावर कुठं कुठं तीळ आहे, हे बाबा त्या बाईला बिनधास्तपणे सांगतो. बाबाच्या या भविष्य वाणीने मग ती महिला लाजून गर्भगळीत होते. आणि घरी जाऊन बंद खोलीत जाऊन बाबाने सांगितलेल्या ठिकाणी आपणाला तीळ आहे का ? हे पाहते. आता बाबाने मारलेला खडा जरा का होईना त्या बाईला लागला,आणि एखाद्या ठिकाणी तिला तीळ असेल तर ती बाई त्या बाबा समोर लोटांगण घालते.
बाबाला सगळं माहिती आहे या आशेने ती बाबाची महती आपल्या इतर मैत्रिणींना सांगते. आणि इथंच अनेक महिला या बाबाच्या नादाला लागतात. सध्या अनेक महिला मंडळात आणि किटी पार्टीत हजेरी लावणारी ही महिला देखील या बाबाच्या जाळ्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
*थापांचा कळस*
बाबाने मारलेल्या थापांचा डोंगर संपता संपत नाही. सांगलीतील एका बड्या नेत्याचा हवाला देत तो अनेक चांगल्या घरात घुसलेला आहे. आणि त्या घरातील महिलांची डोकी फिरवलेली आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी त्याचं कोणीनं कोणी तरी भक्त असल्याचं सांगतो. मराठी चित्रपटात कोल्हापूरचे नाव आपल्या अभिनयाने उंचावणाऱ्या एका महान कलाकाराचा तो *नातू* असल्याच्या थापा तो सध्या कोल्हापुरात मारत आहे. त्याच्या थापांचा कीव सध्या लोकांना येत आहे. मात्र अनेक जण हा तमाशा बघत मूग गिळून गप्प आहेत. या बाबाला आश्रय देणाऱ्या त्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नाही. नग्न पूजेसाठी आलेल्या या बाबावर कारवाई का होत नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रमशः
बाबाचे कारनामे बघून महिलांनी काढला पळ