लिहील्याने माणूस समृध्द बनतो...डॉ. रणधीर शिंदे
schedule10 Mar 23 person by visibility 303 categoryशैक्षणिक

युवराज राजीगरे-चुयेकर
कोल्हापूर
लेखन हे मानसाच्या आयुष्याशी निघडीत असते. असे लिखान केल्यानेच माणूस समृध्द बनतो.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिर येथे ज्ञानदा साहित्यिक मंच आयोजित 'पयोदवर्षा ' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अपर्णा पाटील व कवी संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजीवनी तोफखाने, शर्मिष्ठा ताशी या होत्या. प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी चोरगे होत्या.
डॉ. शिंदे म्हणाले.. आपल्या मनातील तिन्ही ऋतू लेखक आपल्या शब्दातून प्रकट करीत असतो. आपल्या मनातील भावना कवी मांडत असतो. असे ही त्यांनी सांगीतले.
यावेळी अपूर्वा पाटील, निता क्षीरसागर , युवराज राजीगरे , राजू करनूरकर, डॉ. संजीवनी तोफखाने यांचे सह कवी, लेखक उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोगीता महाजन यांनी तर आभार दिप्ती कुलकर्णी यांनी मानले.