' स्विमिंग हब ' कडून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन
schedule13 Aug 22 person by visibility 329 categoryक्रीडा

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत 'स्विमिंग हब ' आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेजच्या सागर पाटील जलतरण तलावावरती या स्पर्धा पार पडणार आहेत.
ही स्पर्धा महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी निमंत्रित स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी प्रथमच इलेक्ट्रॉनिक टचपॅडची सुविधा तसेच व्यक्तिगत ग्रुप चॅम्पियनशिप साठी ट्रॉफी ,रोख रक्कम तसेच सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी सहभाग सर्टिफिकेट तसेच गिफ्ट व ग्रुपमधील प्रथम क्रमांक ,द्वितीय क्रमांक ,तृतीय क्रमांक साठी मेडल,प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट मिळणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व प्रकिया ही वेब साईट द्वारे राबविण्यात येणार आहे.www. swimming hub.org या वेबसाईट द्वारे दि.16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दि.5 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना राज्यस्तरीय खेळाडूंसोबत खेळता यावे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात जलतरण स्पर्धांचे आयोजन ठप्प झाले होते.या स्पर्धेद्वारे जलतरण खेळाडूंसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण निर्माण करणे हा ही आयोजकांचा हेतू आहे.जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन 'स्विमिंग हब ' कडून करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस व्यवस्थापन समिती अध्यक्ष एम.बी. शेख,समीर चौगुले ,किरण भोसले,प्रमोद पुंगावकर,भाऊ घोडके,रमेश मोरे व इतर उपस्थित होते.