+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule22 Jun 22 person by visibility 234 categoryआरोग्य

आवाज इंडिया प्रतिनिधी 

 कपिल घाटगे

कोल्हापूर दि. २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे एबीपी स्पोर्ट्स व वुशू असोसिएशन कोल्हापूर, यांच्या वतीने महावीर गार्डन नागाळा पार्क, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा करण्यात आला.
         प्रारंभी संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. त्यावेळी ते म्हणाले, योग दिनाच्या निमित्ताने योग म्हणजे काय, तर योग म्हणजे जोडणे या अर्थाने शरीर आणि मन यांना जोडण्याचे काम ज्या क्रियेमधून केले जाते त्याला योग किंवा योगा म्हटले जाते. कोट्यवधी लोकांना एकत्रितरीत्या योग करून निरोगी राहण्याचा व शांततेचा संदेश या दिवशी दिला जातो.
       याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख. फिटनेस प्रशिक्षक योग साधक अनिल पटेल यांनी दैनंदिन जीवनात योगाचा फायदा कसा होतो. याची माहिती खेळाडूंना दिली. कारावा हॉलिडेज प्रेरणादायी पर्यटन संस्थापक वाशिम सरकवास यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे आणि योगासनाचे परदेशात खुप छान पध्दतीने फायदे घेतले जात आहेत.याची माहिती दिली.
       महेश पवार,सागर पाटील,मिलिंद कोळी यांनी योगा मधील ७ चक्रांचे फायदे,आहार,विहार,मूलमंत्र आचार,विचार,यांच्या संदर्भात माहिती दिली. योगासनामुळे एकाग्रता साध्य होते.अशी माहिती या योग साधकांनी दिली. 
       एबीपी स्पोर्ट्सचे संस्थापक अविनाश पाटील यांनी वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, उष्टासन,शशकासन, वक्रासन सेतुबंधासन,उत्तानपाद आसन हनुमानआसन इत्यादी आसने खेळाडूंच्याकडून प्रात्यक्षिक करून घेऊन योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न केले.  
      यावेळी पन्हाळा,कोतोली, सांगली,कोकरूड,शिरोळ, कोल्हापूर येथील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.