+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule14 Feb 23 person by visibility 463 categoryलाइफस्टाइल


होय प्रेम करतोय मी तुमच्यावर. मीच घेतोय तुमची काळजी. मीच सांगतोय सगळं खरं काही. मीच वाचवतोय तुम्हाला अनेक धोक्यापासून. मीच थोडासा का असेना देतोय आधार. म्हणून होय करतोय मी तुमच्यावर प्रेम.
 तसं यापूर्वी तुमच्यावर प्रेम असायचं कारण काहीच नाही. जसं या माध्यमात प्रवेश केला; तसं तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रेम निर्माण झालं. म्हटलं भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा किती गैरवापर होतो. तुमची किती फसवणूक होते. म्हणून म्हटलं या संविधानाच्या आधारावर तुमच्यावर कोण अन्याय अत्याचार करणार नाही याची दक्षता मी नाही घेणार तर आणखी कोण घेणार? कारण मी तुमच्यावर प्रेम करतोय. नाहीतर आपल्याकडे देण्यासारखं काय? 'प्रेमाशिवाय'.
 आता तुम्हाला हॉटेलात चॉकलेट, बर्गर, पिझ्झा, चिकन, मटन, फिश देणारी खूप आहेत. पैसे खिशात नाचायला लागलं काय काय वाटेल ते सुचतं. पण खरच त्यापासून काय फायदा आहे का तोटा आहे. तेवढी बुद्धिमत्ताच नाही ना त्यांना. कारण पैसा असला की बुद्धिमत्ता कमी असते. आम्ही मात्र बुद्धिमान माणसं. तुम्हाला त्याच्या उलटं सांगणार 'वरचं काय खाऊ नका, फक्त फळे खावा. कारण मला माहित आहे मी ज्यांच्यावर प्रेम करतो तो बर्गरने लवकर मरतो. फळाने जास्त जगतो. मग तुम्ही सांगा तुमच्यावर खरं प्रेम कोण करतोय मीच ना.

सुरुवात तुमच्या आरोग्यापासून करूया. व्यायामापासून ते खाण्यापिण्यापर्यंत बातम्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून मीच सांगतो ना तुम्हाला. आरोग्य कसे चांगलं राखायचं. तरुण कसं राहायचं, कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करायचा, खरंच कोरोना आहे काय. माझं ऐकून थोडा का असेना तुम्हाला आधार मिळालाच. कोरोना झालेल्या पेशंटला कोणी हात लावायचे धाडस केलं नाही. मी मात्र त्याच्या हातात हात घालून त्याला नेले. कित्येक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखलं. म्हणून त्यांचे प्रांणतरी वाचले. बहुतांश पत्रकार कोरोना आहे,कोरोना किती झाला, कोरोना किती वाढला, कुठल्या गावात किती पेशंट हे सांगण्यात मग्न असताना मी मात्र एकट्याने कोरोनाच्या विरोधात सविस्तर मुलाखत घेतली. 
कित्येकांनी मला मूर्खात काढले पण आता मात्र म्हणतात तू सांगत होतास तेच खरं होतं.झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये तसं कोरोना न केलं. सर्वांची फसवणूक केली.
साधा ताप. चार-आठ दिवसात बरा होणारा. कोणत्याही औषधाशिवाय. कोरोनावेळी मात्र या तापासाठी अनेकांनी लाखो रुपये खर्च केले तर अनेकांनी जीव सुद्धा गमावले. आमच्या सहवासातील लोकांना मात्र आपण धीर देण्याचा प्रयत्न केला कारण खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे.

 तुमच्या शैक्षणिक करिअरसाठी त्या विषयातील तज्ञांच्या मुलाखती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचा मार्ग सुकर व्हावा. कोणताही अडथळा येऊ नये,तुम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरावे, यासाठी तुमची मानसिक तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा, ध्येया पर्यंत कसे जावे हे सुद्धा बातम्यां, मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगतो ना. शिक्षण घेत असताना काय अडचणी झाल्या तरीसुद्धा तुमच्या बाजूने बातम्या प्रसिद्ध करून न्याय मिळावा यासाठी धडपडतोही मीच कारण खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे.
कळंबा येथे एक भोंदू बाबा मुला- मुलींना जन्म देण्यासाठी औषध देतो म्हणून फसवणूक करत होता. हजारो लोक जाऊन त्या ठिकाणी औषध घेत होते.मला ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी मी त्याच स्ट्रिंग ऑपरेशन केलं. तो काय औषध देतोय त्याची चाचणी केली.फसवणूक करतोय असे माहिती झाल्या झाल्या त्याच्या विरोधात लोकमतमध्ये बातमी छापली. त्याला अटक झाली. तक्रार माझ्या नावावरच आहे. का केले हे, कशासाठी तुमच्यासारखी माणसं विज्ञानाकडे दुर्लक्ष करून भोंदू बाबाला बळी जातात, तुमची फसवणूक होते ही फसवणूक होऊ नये म्हणून. मी तो प्रकार उघडकीस आणला. का निव्वळ माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून.
देशाची सेवा करून सुद्धा देशात काही सैनिकांना न्याय मिळत नसेल तर माझ्यासारखा माणूस प्रशासनाच्या विरोधात लढतो. पुढारीत पंधरा-वीस भागाची मालिका लावतो.त्यांना न्याय मिळवून देतो; कारण देशावर प्रेम करणाऱ्या सैनिकावर मी प्रेम करतो. 
काबाड कष्ट करून रोजंदारी करणाऱ्या लघुउद्योजक दुकानदाराला प्रशासन अधिकारी ज्यावेळी लुबाडतात त्यावेळी सुद्धा दहा-पंधरा भाग लिहून त्या अधिकाऱ्याला निलंबित करीतोपर्यंत त्याचा पाठलाग करतो; शेवटी प्रशासन त्याची दखल घेऊन त्या अधिकारी महिलेला निलंबित करतात. एवढी सगळी जोखीम मी उचलतोय त्या काबाडकष्ट करणाऱ्या लोकांच्यासाठी कारण एकच माझं प्रेम आहे.
तरुण पोरं मटक्याच्या नादाला लागू नये म्हणून मटका बंद करा असं बातमी लिहितो. मटकेवाले मला फोन करतात. 'या साहेब' मी म्हणतो, 'मटका बंद करा आणि भेटा' कधी कधी भीती वाटते साला वाटत कुठेतरी अडवून मारणार तर नाही ना. मग काय मी घाबरतो?. मरण काय कधी येणारच. मी मात्र लिहीत जातो कारण माझं माझ्या लेखणीवर प्रेम आहे. कोणतरी छळत असलं त्याच्याविरोधात लिहायला मला खूप मजा येते आणि खऱ्या अर्थाने जिवंत असल्यासारखं वाटतं.
आज माध्यम छोटं असलं तरी मनाजोगं लिहिता येतं याचं मला खूप समाधान वाटतं.कारण मी माझ्यावर सुद्धा खूप प्रेम करतो.
कृषीप्रधान देशात सर्वाधिक जास्त प्रेम शेतकरी, मजूर यांच्यावर सुद्धा करतो.कारण ती आहेत तर सर्व आहे.
पत्रकारितेतील सांगणारी उदाहरण खूप आहेत.
 ज्यांच्यासाठी आम्ही करतोय ती खरच आमच्यावर प्रेम करतात का भेटतात का बोलतात का. साधं आभारी आहे असे तरी म्हणतात का. या सर्वांचे उत्तर नाही असेच आहे. 

मी सध्या तरी एवढेच सांगतो मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला माहित आहे तुम्हाला माझ्यावर प्रेम करणं शक्य नाही.आणि तुम्ही करणारही नाही. असलं तर सांगणार सुद्धा नाही. मला खरंच अपेक्षा सुद्धा नाहीत. कारण बरं बोलणारा मी नाही. मी तर सत्य सांगणारा आणि खरं बोलणारा आहे. तुम्ही पारंपारिक विचार जपणारे. आम्ही मात्र त्याला छेद देणारे.अर्थात आम्ही याचा काय शोध लावलेला नाही. महापुरुषांचे विचार आणि पुस्तक वाचली की आपोआप धाडस निर्माण होते. त्याचाच काही अंश आम्ही तुम्हाला सांगतो. 
आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त वाटेत चुकून कधी भेट झाली तर बघून हसा. त्या मनापासून हसण्यामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या हास्याची प्रतिमा डोक्यात साठून जाते.संग्रहित राहते.आणि मग कधी डिस्टर्ब व्हावसं वाटलंच; तर तुमच्या तो हसरा चेहरा आठवून पुन्हा जगावसं वाटतं.
आणि हो सांगायचं राहिलंच खरंच माझ़ं तुमच्यावर प्रेम आहे.

 I LOVE YOU

Prashant chuyekar