Awaj India
Register
Breaking : bolt
पुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन

जाहिरात

 

पुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश

schedule24 Jun 26 person by visibility 71 categoryगुन्हे

कोल्हापूर, दि. २४ : सम्राट नगर व प्रतिभानगर परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेने पुण्यसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था व संबंधित विकासक रामसिना कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांना नोटीस बजावली आहे. 
 
महापौर जनता दरबारात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पुण्यसृष्टी प्रकल्पाच्या पश्चिमेकडील १२ मीटर रुंद रस्त्यावर फुटपाथ व गटाराचे बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याची बाब समोर आली होती. तसेच मालती अपार्टमेंट परिसरातील मनपाच्या जुन्या फुटपाथ व गटाराची रचना बदलून चुकीच्या मोजमापाने नवीन बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, शिंदे अपार्टमेंटजवळील महापालिकेच्या मालकीच्या ओढ्याभोवती पत्र्याचे कुंपण करून तो विकासकाच्या हद्दीत घेतल्याचीही तक्रार नागरिकांनी केली होती.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता १२ मीटर रुंद रस्त्यावर फुटपाथ व गटाराचे बांधकाम करून अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने संबंधितांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण हटवून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes