Awaj India
Register
Breaking : bolt
दूध उत्पादकांनो भाकरी देणाऱ्या आनंदराव पाटील चुयेकरांना विसरणार काय? कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा जाहीर पाठिंबा*शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कौस्तुभ गावडे कटिबद्ध; शिक्षक व पदवीधर प्रचारात भाजपाची साताऱ्यामध्ये मुसंडी अक्कलकोटमध्ये कौस्तुभ गावडे यांना वाढता प्रतिसाद राधानगरीत महायुतीला धक्का; किसन चौगुले समविचारी आघाडीतइस्पुर्ली पोलिसांची विशेष कामगिरी; ३.१५ लाखांचे १४ मोबाईल शोधून मालकांना परतदुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत कौस्तुभ गावडे यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखलपुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या नावाची चर्चा; शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.

जाहिरात

 

गतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

schedule25 Oct 24 person by visibility 416 categoryराजकीय



कोल्हापूर ; 
गतवेळच्या विधानसभा मतदारसंघात 42 हजारपेक्षा अधिक मताने विजयी झालो, आता यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी पुढाकार घेतला. विरोधकांनी विकास कामाच्या ठिकाणी जाऊन तपासावी म्हणजे त्यांना समजेल किती विकासकामे झाले आहेत.

आयटी पार्कमध्ये बेरोजगारांना मिळणार संधी

आमदार पाटील म्हणाले, कोरोना यासह विरोधकांचे सरकार असल्यामुळे बरेच काम करता आलं नाही. आयटी पार्क साठी काम सुरू असून येणाऱ्या भविष्यकाळात ते काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पाच वर्षात ग्रामीण भागातील रस्ते यासह क्रीडांगण विविध विकास कामे करता आली. यापुढेही उर्वरित कामे करणार असून भागाचा कायापालट करणार आहे. मतदार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून यावेळी सुद्धा ते मला भरघोस मतांनी विजयी करतील असे पाटील यावेळी म्हणाले.

जिल्हाभर नियोजन असल्यामुळे मतदारसंघात मतदान कमी

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिण लोकसभा मतदारसंघात मला तेवढा वेळ देता आला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात
मताधिक्य कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes