कोल्हापूर ;
उर्दू विद्या मंदिर घोसरवाड तालुका शिरोळ येथील मोहम्मद असिफ खलील मुजावर यांना क्रांतिबा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे कृती फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी 1 सप्टेंबर रोजी दुपारीी बारा वाजता
या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मुजावर यांनी शैक्षणिक उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य, कला, क्रीडा यासह शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. महापुरुषांच्या वर विविध लेखन व्यसनमुक्ती आदी विषयावर त्यांनी लेखन केले आहे.