Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासा

जाहिरात

 

संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात

schedule30 May 25 person by visibility 980 categoryसामाजिक

उचगाव : येथील विठ्ठलाई कॉलनी छत्रपती शिवाजीनगर येथे संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज यांच्या उपस्थितीत हा भंडारा मोठ्या लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात आणि हलगी कैताळाचा निनादात पार पडला. यावेळी भजनी मंडळांनी सुद्धा हजेरी लावलेली होती. यामुळे वातावरण आणखीच आध्यात्मिक झाले. दरवर्षी या उत्सवाचे नियोजन छत्रपती शिवाजीनगर मंडळ यांच्याकडून करण्यात येते.  बुधवारी 28 मे रोजी रात्री नऊ वाजता स्वामी समर्थ भजनी मंडळ,  साईनाथ भजनी मंडळ, बाळूमामा संगीत भजनी मंडळ यांच्याकडून भजन सेवा देण्यात आली.  गुरुवारी 29 मे रोजी पहाटे बाळूमामाच्या मूर्तीला अभिषेक, पूजा,आरती करण्यात आली.  सकाळी नऊ वाजता श्रींचे अश्व आले, त्यावेळी भव्य पालखी सोहळा झाला व वालुंग सोहळा सुद्धा झाला हे पाहण्यासाठी हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली.  त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप झाले. गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप झाले.  हजारो लोकांनी याचा लाभ घेतला.  या संपूर्ण कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी नगर येथील सर्व भक्त परिवाराने परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes