
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सख्खे झाले वैरी ; वैरी झाले सख्खे याचा प्रत्यय बघायला मिळत आहे.कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक खासदार व संजय मंडलिक एकत्र आले तर कारखान्याची चेअरमन के. पी. पाटील व संचालक ए. वाय. पाटील विरोधात निवडणूक लढत आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्या मागणीनुसार निवडणूक बिनविरोध करावी या विचाराला फाटा दिला असल्याचं त्यांनी सांगितले. तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार निवडणूक एकत्र लढवत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.
चेअरमन के पी पाटील यांचे सख्खे मेव्हणे ए. वाय. पाटील यांनी कारखान्याच्या हितासाठी आपण विरोधात लढत असल्याचं त्यांनी सांगितले.
शाहू कारखान्याचे चेअरमन समरजीत घाटगे यांचे विरोधक हमीदवाडा कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक दोघांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत कारखाना हितासाठी लढत असल्याचे सांगितले.
गजराच्या निवडणुकीत ए वाय पाटील के पी पाटील यांच्यासोबत होते.विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यामधील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.त्यामुळे ए वाय पाटील विरोधात गेल्याचं बोलले जात आहे.