+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule04 Mar 24 person by visibility 73 categoryराजकीय

'जागतिक श्रवण दिन' उत्साहात साजरा
कोल्हापूर ;
  डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे दिवस 'जागतिक श्रवण दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा यानिमित आयोजित करण्यात आला होता. या मुलांचे बोलणे ऐकून उपस्थित पालक व डॉक्टर याच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान ओसंडून वाहत होते.

  दरवर्षी 3 मार्च हा दिवस 'जागतिक श्रवण दिन' म्हणून साजरा केला जातो. कर्णबधिरते संबंधीचे गैरसमज दूर करणे, त्याचबरोबर निदान व उपचार पद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याचा लाभ त्यांना मिळवून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मुलांमधील कर्णबधिरता दूर करण्यासाठी कॉक्लेअर इप्लांट हा प्रभावी उपाय आहे. डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटलच्यावतीने आजपर्यंत १४ मुलांवर कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन करण्यात आले आहे. या मुलांचा मेळावा यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख, सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. नितीन घोरपडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री माने, संवाद श्रवण व वाचा केंद्राचे शिल्पा व यश हुजूरबाजार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 
कॉक्लेअर इप्लांट झालेल्या मुलांच्या पालकांनी डी वाय पाटील हॉस्पिटलकडून होत असलेली तपासणी, उपचार व झालेल्या मोफत ऑपरेशनबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. आपली मुले उपचारानंतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे नेहमीच्या शाळेत जात आहेत. आमच्याशी संवाद साधत आहे याचा मोठा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ऑपरेशन झालेल्या मुलांनी गाणी म्हणणे अंक मोजणे,पालकांशी संवाद साधणे इत्यादी श्रवण आणि वाचा संदर्भातील प्रगती सर्वांसमोर सादर केली. 

यावेळी हॉस्पिटलच्या कान -नाक- घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री माने यांनी कॉक्लेअर ऑपरेशन संदर्भात माहिती दिली. या ऑपरेशन साठी राज्य शासनाची राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना व केंद्र शासनाची एडीआयपी आणि इ एस आय सी योजना हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असून हे ऑपरेशन मोफत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 संवाद श्रवण व वाचा केंद्राचे शिल्पा व यश हुजूर बाजार यांनी ऑपरेशनपूर्वीची श्रवण क्षमता निदान व ऑपरेशननंतरची स्पीच थेरपी याची माहिती दिली. 
कोल्हापूरच्या सिव्हिल सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख यांनी शासनामार्फत उपलब्ध असणाऱ्या श्रवण निदान व उपचार संबंधी योजनांची माहिती दिली. डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल व सेवा रुग्णालय यांनी संयुक्तपणे लहान मुलांच्यातील श्रवणदोष या संदर्भात निदान व उपचार शिबिर घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा यांनी यांनी इप्लांट सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार करण्याचे आश्वासन दिले. 
वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. नितीन घोरपडे व डॉ. भरत कोटकर यांनी कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन या सामाजिक कार्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड म्हणाले, मुल जन्मल्यानंतर एका महिन्याच्या आत श्रवण क्षमता चाचणी झाल्यास व लगोलग उपचार सुरू झाल्यास त्याला ऐकु येऊ शकते. दोन वर्षाच्या आत कॉक्लेअर इप्लांट झाल्यास अशी मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे ऐकू व बोलू शकतात, त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक आहे. 

    या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन साठी सहकार्य करणारे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे समन्वयक, इ एस आय सी हॉस्पिटलचे काना घसा तज्ञ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. संदीप कदम, डॉ निवेदिता पाटील, डॉ. नीलिमा शहा, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे समन्वयक, आशा सेविका आणि सर्व नर्सिंग इन्चार्ज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बाळासाहेब पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर अंजना मोहिते यांनी केले.

 
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल , रजिस्ट्रार डॉ. विश्वनाथ भोसले, यांचे मोलाचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.


*डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये श्रवण तपासणी व उपचार उपलब्ध*
 डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमधील कर्णबधिरते संदर्भात सर्व निदान व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. याबरोबरच नवजात लहान मुलांमध्ये ऐकण्याच्या क्षमतेचे निदान करणे व सर्व तपासणी करणे व गरज लागल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॉक्लेअर इप्लांट हे ऑपरेशन करून मुलांना श्रवण क्षमता प्रदान करणे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.