तर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ?
schedule05 Dec 23 person by visibility 288 category
आवाज इंडिया
कोल्हापूर - प्रशांत चुयेकर
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर के. पी. पाटील यांचीच सत्ता आली. विजयाला उत्तर देताना चेअरमन पाटील यांनी आता परिवर्तन 2024 ला असं उत्तर देत थेट आ.प्रकाश आबीटकर यांना विधानसभेसाठी चॅलेंज केले.
बिद्री सहकारी साखर कारखाना आताच्या पॅनलमध्ये
विधानसभेतील विरोधक सोबत होते. ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते सोबत कायम राहिल्यास के.पी. पाटील यांना विधानसभा निवडणूकीत परिवर्तन घडवण्यास मदत होऊ शकते.
विधानसभेतील उमेदवार गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा राहुल देसाई, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित जाधव यांनी निवडणूक लढवली होती.
के. पी. पाटील यांचा पराभव 18,430 मतांनी झाला होता. बिद्री कारखाना निवडणुकीत सध्या सोबत असणारे अरुण डोंगळे यांना 15,336 मते सत्यजित जाधव यांना 5,952 मते, राहूल देसाई 12,901 मते पडली होती. यासह इतर उमेदवारांना सोबत घेतल्यास विधानसभेचा टप्पा पार करण्यासाठी के.पी यांना कोणी अडवू शकत नाही.
बिद्री साखर कारखाना निवडणुकीत ए. वाय. पाटील यांचा कोणताही करिष्मा दिसला नाही त्यामुळे त्यांच्यापासून विधानसभेला काय धोका असू शकतो याची भीती आता केपी यांना राहिली नाही असेही बोलले जातं.