+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule29 Feb 24 person by visibility 426 category
प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूरचे ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक विलास कृष्णा शिंदे ३७ वर्षाच्या सेवेनंतर २९ फेब्रुवारी, २०२४ (गुरुवारी) रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

कोल्हापूर ; 
ज्ञानदानाचा अखंड वारसा शिंदे कुटुंबियांनी जपला आहे. प्रायव्हेट हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक विलास कृष्णा शिंदे हे आपल्या ३७ वर्षाच्या दीर्घकालीन सेवेनंतर २९ फेब्रूवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.शिंदे यांचे मूळ गाव किल्ले पन्हाळा (मंगळवार पेठ)आहे. त्यांचे वडील न्यायालयात नोकरीत होते. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, पन्हाळा विद्यामंदिर आणि विवेकानंद कॉलेज येथे सायन्स मधून महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पेटाळा येथे डी. एड आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या गारगोटी येथील केंद्रातून बी. एडची पदवी धारण केली. 
नोकरीची सुरुवात सांगरुळ हायस्कूल, सांगरुळ येथून झाली. त्यानंतर प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या तवनाप्पा पाटणे हायस्कूल व प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ज्ञानदानाचे काम केले. त्यांची एकूण शिक्षण क्षेत्रात ३७ वर्षे सेवा झाली. गणित व भूगोल विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. गणित प्राविण्य,गणित प्रज्ञा परीक्षा,स्कॅालरशिप परीक्षा,नवोदय परीक्षांचे मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी ठरले.शाळेचा व संस्थेचा परीक्षा विभाग सलग २५ वर्षांहून अधिक काळ नियोजनबद्ध व समर्थपणे सांभाळला.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असताना ते सामाजिक कार्यातही मागे राहिलेले नाहीत. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढी,कोल्हापूर या संस्थेत त्यांनी कर्मचारी म्हणून काम केले त्याच संस्थेचे ते चेअरमन झाले, ही त्यांच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान आहे. 
पुईखडी येथील जिवबा नाना जाधव पार्कचे संस्थापक सदस्य आहेत. तर नियोजित छत्रपती शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेत्तर असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ज्ञानादानाच्या कार्यासोबत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे. अनेक गरीब कुटुंबाना आपल्या परीने मदत करुन त्यांची कुटुंबे उभी केली आहेत. वाडी वस्तीवरील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सामाजिक कार्याचा वारसा ते सेवानिवृत्तीनंतरही जपणार आहेत.
त्यांचे सारे कुटुंबिय ज्ञानदानाच्या कार्यात सेवा देत आहे.निश्चितच सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यातही ते ज्ञानदानासह सामाजिक सेवेचा वारसा जपतील आणि त्यांच्या हातून एक नवी सुसंस्कारित पिढी निर्माण होईल.
             शिस्तप्रिय,प्रामाणिक ,सुसंस्कारी,निर्व्यसनी,आदर्श व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले श्री.शिंदे सर यांना सेवानिवृती नंतरच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
०००००