
कोल्हापूर आवाज इंडिया
सभासदांच्या विश्वासामुळे नरके पॅनलचा विजय निश्चित असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रे पंचवार्षिक निवडणूक दरम्यान,सातार्डे, येवलुज, पडळ, माजगाव या ठिकाणी नरके पॅनल यांच्या वतीने ताकदीने प्रचार सभा घेण्यात आल्या.
कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय डी सी नरके यांनी करवीर, पन्हाळा, गगनबाडा, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. त्या नरके साहेबांचं उपकारांची परतफेड करण्यासाठी सभासद सज्ज झाले आहेत. नरके पॅनलच्या अंगठी या चिन्हाला बहुमताने निवडून देण्याचा निश्चय सभासदांनी केला आहे.
या प्रचार सभेत माजी आमदार चेअरमन चंद्रदीप नरके यांच्यासह पॅनलचे नेते उमेदवार यांनी कारखान्याचा विकास कामाचा अजेंडा सांगितला.