+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन adjustपिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule25 Jul 24 person by visibility 494 category
                                                                                                         
 कोल्हापूर ;

९ ऑगस्ट क्रांती दिन रोजी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग मंत्रालय प्रमुख आ. बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 11 वाजता मोर्चा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील हजारो दिव्यांग या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्रातील एक लाख दिव्यांग उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे, दिव्यांगांना घरकुल योजना, दिव्यांगांना नोकरी आणि व्यवसायासाठी जागा, राजकीय आरक्षण मिळावे, या तीन प्रमुख मागण्यासह इतर मागण्याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. 
या आंदोलनास कोल्हापूर जिल्ह्यातील 876 दिव्यांगांची नाव नोंद मोफत बसची सोय करण्यात आली आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असल्याने दोन ते तीन लाख दिव्यांग यात सहभागी होणार आहेत.आंदोलनाची तिव्रता लक्षात घेऊन सरकार मार्फत खबरदारी घेतली जात आहे. दिव्यांगांच्या मागण्याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नसलेची माहिती आमदार बच्चु कडू यांनी दिली आहे.

   यावेळी विकास चौगुले, शहराध्यक्ष अरुण विभुते, महिलाध्यक्षा जयश्री शिंदे, विष्णुपंत पाटील, दिलीप कांबळे, रावसाहेब मिठारी, सईद पिरजादे, आसमा बडेखान, जानकी मोहिते, उज्वल चव्हाण, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 आंदोलकासाठी मोफत बस, निवासाची व जेवणाची सोय   
  
  कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दिव्यांगांना जाण्या - येण्या साठी मोफत बस, निवासाची व जेवणाची सोय केली असुन आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांना 9860703269 या क्रमांकावर संपर्क साधावा.