Awaj India
Register
Breaking : bolt
डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिकाकोल्हापूर महानगरपालिका प्रभाग 20 मध्ये किशोरी कोळेकर चर्चेत

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवड

schedule05 Feb 25 person by visibility 310 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ४९ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी  निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस. सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना करून दिली जाते. देशाच्या विविध शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या ४९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

यामध्ये  गोवा, मुंबई , पुणे, कोल्हापूर, बेळगावमधील कॉनराड, डब्लू, सयाजी हॉटेल, हिल्टन गार्डेन, द वेस्टीन, द ललित, मुझा हॉस्पिटॅलिटी, फोर सिझन्स, या हॉटेल्समध्ये  निवड झाली आहे. सदरचे प्रशिक्षण हे चार महिन्याकरिता असून या काळात विद्यार्थ्यांना हॉटेल्स मधील सर्व विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.

 या विद्यार्थ्यांना  महाविद्यालयाचे  प्राचार्य रुधीर बारदेस्कर , ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes