Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड**मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावेकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका’*कार्यालयात वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावेवनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* खा.महाडिक यांचा जलशक्ती मंत्र्यांसमोर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न*शंभर कोटी रस्त्यांची क्वालिटी चेकअप करणार; आ. सतेज पाटीलवरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात होणार शिक्षकांची " परीक्षा " किमान 50 % गुण प्राप्त न झालेस करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील..

जाहिरात

 

जागतिक अन्न सुरक्षा दिन

schedule08 Jun 21 person by visibility 1388 categoryआरोग्य

डॉ.युवराज मोटे (कोल्हापूर) : दरवर्षी 7 जून हा दिवस जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 2018 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्नसुरक्षा दिन साजरा करण्याचे ठरविले. पौष्टिक व सात्विक आहार मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. खराब व सकस अन्नाच्या अभावामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे अन्नसुरक्षा करणे आवश्यक आहे. 

आहार दूषित व खराब होऊ नये, अन्नाचे महत्त्व लोकांना समजावे, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची गरज व साठवण यांचे महत्व समजावे म्हणून जगभरात अन्न सुरक्षा दिन साजरा केला जात आहे. या वर्षीची संकल्पना The Theme of World Food Safety Day is 'Safe Food Today for a Healthy Tomorrow. अशी आहे. तसेच या वर्षीचे स्लोगन 'Food Safety is Everyone's Business असे आहे. 

उद्याच्या चांगल्या किंवा उत्तम आरोग्यासाठी आज शुध्द आणि सुरक्षित अन्नाचे सेवन करा असा ही संदेश यामधून व्यक्त होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने विशद केली आहे की अन्नाची सुरक्षा व उत्पादने हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दर वर्षी चार लाख वीस हजार नागरिकांचा मृत्यू दूषित अन्नाचे सेवन केल्यामुळे होते. त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण चाळीस टक्के आहे. 

सुमारे एक लाख पंचवीस हजार लहान मुले दूषित अन्न सेवन केल्यामुळे जगभरात मृत्युमुखी पडतात. आज सकस आहाराची गरज आहे. भारतामध्ये सुध्दा दुषित अन्न व कुपोषण यामुळे अनेक लहान मुले दगाविली जात आहेत. म्हणून देशातील लोकांना सकस, पौष्टिक, संतुलित आहाराची उपलब्धता करून देणे गरजेचे बनले आहे. 

भारतामध्ये अन्नसुरक्षा निर्देशांक निश्चित करण्याचे काम भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India- FSSAI) यांच्या मार्फत केले जाते. अन्नाची दीर्घकालीन सुरक्षा करणे, अन्नाची नासाडी थांबिवणे, जे भुकेले आहेत त्यांना अन्न पुरविणे, कुपोषण कमी करणे आवश्यक आहे. लोकांना सुरक्षित व पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. अन्न पदार्थ व उत्पादने चांगल्या पध्दतीने निर्माण करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. अन्न सुरक्षा ही एक सामाजिक जबाबदारी आहे. म्हणून अन्नाची सुरक्षा करणे महत्वाचे आहे.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes