+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule23 Mar 24 person by visibility 89 category

*कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*

कोल्हापूर दि.२३ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची सामाजिक कार्याची शिकवण, लोकांना न्याय देण्याची धडपड सुरूच ठेवल्याने कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिण मधील नागरिकांचेही पाठबळ वाढत चालले आहे. दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व "दक्षिणोत्तर" या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा वाहती करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर शहराचा अविभाज्य घटक असून याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग शहरप्रमुख श्री.प्रभू गायकवाड यांच्या शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज साध्यापद्धतीने पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दक्षिण मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी नागरिकांना फक्त गाजर दाखविण्याचे काम केले आहे. हा मतदारसंघ दोन गटांच्या वादातच अडकला आहे. त्यामुळे विकास कामे तर दूरच नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. युवापिढीस राजकारणात गुंतवून स्वत: चा स्वार्थ साधण्याच्या संधीसाधू प्रवृत्तीस या मतदारसंघातील नागरिक कंटाळले आहेत. त्याचमुळे शिवसेनेस पाठबळ वाढत आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण दोन्ही मतदारसंघातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दक्षिण - उत्तर असा कोणताही मतभेद न करता लोकांना न्याय देण्याच काम करत आलो आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाज कारणाचा मूलमंत्र वापरून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मध्ये विकास कामांची गंगोत्री प्रवाहित करू. ओपन जिम, खेळणी, क्रीडांगणे, वॉकिंग ट्रॅक, समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना विकास पर्वाकडे घेवून जाऊ, अशी ग्वाही दिली.   
यावेळी उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख श्री.प्रभू गायकवाड, उपशहरप्रमुख कपिल केसरकर, प्रदीप मस्के गुणवंत नागतळे अमित जाधव रुपेश डोईफोडे निहाल मुजावर संजय गाडीवडार प्रदीप देसाई अभिजीत पवार दयानंद नागटिळे अक्षय पट्टण अमर जराग प्रसाद उर्फ भाऊ पाटील अर्जुन शिंदे किसनराव कल्याणकर किरण यादव निवास राऊत चंद्रकांत दिघाल योगेश मांजरे गौतम कांबळे रोहित भाले अक्षय शाहीर संतोष मस्के पिंटू भोईटे संजय नडवणे यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   


schedule31 Dec 23 person by visibility 136 categoryक्रीडा
*नाणेघाट,शिवनेरी गड पदभ्रमंती मोहीम* 
 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २३ व २४ डिसेंबर रोजी नाणेघाट, जीवधन, चावंड,शिवनेरी गड ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पी.सी.ई.टी अडव्हेंचर क्लबच्या सहकायनि आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमध्ये ३० विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट,जीवधन,चावंड,शिवनेरी गडांचा इतिहास, निसर्ग सोंदर्य,जीवसृष्टी ची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व तसेच जीवधन व चावंड गडांवरती स्वच्छता मोहीमही राबवली.

सुमारे १८ किलोमीटरचा हा ट्रेक विद्याच्यांनी पूर्ण केला, पी 2 पी ट्रेकर्सचे अमित कोष्टी (इचलकरंजी) यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अॅडव्हेंचर क्लब व राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. योगेश चौगुले, सुदर्शन साळोखे,योगेश कुंभार आणि विनायक लांडगे हे उपस्थित होते. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी संकेत घाटगे, गौरव चौगले, अथर्व गगाने, तनिषा मदाने, पल्लवी पाटील श्रेया वाघ,अथर्व ढेरे विद्यार्थी समन्वयकांनी मेहनत घेतली. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ.राहुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.