Awaj India
Register
Breaking : bolt
*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करूया: शुभांगी अडसूळचर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिकसिंधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - अमल महाडिकआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडपर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार - राजेश क्षीरसागर बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर*

जाहिरात

 

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा; योजनांचा लाभ घ्या

schedule18 Oct 21 person by visibility 7963 categoryउद्योग

शेतकऱ्यासाठी सुवर्णसंधी

शेती उत्पादक कंपनी 
Farmer Producer Company

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्या नाबार्ड बँक महाराष्ट्र शासन 
केंद्र शासन यांचीं कर्ज योजनेचा लाभ घ्या. 25% ते 35% टक्के सबसिडी सुद्धा मिळते. 
तसेच तुम्ही शेतकरी लोकांना सभासद बनवू शकता.यातून जमा झालेला पैसा शेतीशी निगडित वेगवेगळ्या कोणत्याही व्यवसायात लावू शकता. 

या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही खालील व्यवसाय करू शकता
पोल्ट्री फार्मिंग
गोट फार्मिंग
डेअरी फार्मिंग,
मिल्क प्रोजेक्ट
फिश प्रोजेक्ट,
मशरूम प्रोजेक्ट 
अंडी प्रोडक्शन,
fmcg प्रोडक्ट प्रोडक्शन
आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट, बायोफ्युल डेवलपमेंट प्लांट
ॲग्री आणि रिटेल मार्ट 
ऑरगॅनिक फार्मिंग 
व इतर आग्री प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग 
कोल्ड स्टोरवगे 
सीएस फार्मिंग
 किसान सेवा केंद्र
किसान कॉल सेंटर 
सेल्स आणि मार्केटिंग 
महिला व पुरुष गटांना प्रशिक्षण देणे 
पापड उद्योग
फुलाची शेती
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे  
करार पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना पिकासाठी मोफत मार्गदर्शन करणे
शेतकऱ्यांना क्रेडीटवर रोपे अवजारे बी-बियाणे
खत-बियाणे देणे
 स्वच्छ भारत अभियान राबवणे
 प्रक्रिया उद्योग व विक्री
 आठवडी बाजार
 जलयुक्त शिवार अभियान 
 स्वच्छ भारत अभियान 
 आमचं गाव आमचा विकास अभियान
 समृद्ध शेतकरी अभियान
 उन्नत शेतकरी अभियान
 आरोग्य विकास उपक्रम
 वृक्षरोपण अभियान इत्यादी 
वर्षभर हमीभाव माल खरेदी- विक्री करणे.

*शेती उत्पादक कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी कंपनी काय काय करू शकते*

उत्पादन,प्रोक्यूरमेन्ट,हार्वेस्टिंग सीडींग,पूलींग,हाताळणी, विपणन,मार्केटिंग,विक्री,निर्यात आयात,करू शकता. कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करून घेऊ शकतात. 
याठिकाणी आपण हरभरा आणि सोयाबीन या पिकाचे उदाहरण घेणार आहोत 
 *उत्पादन*:- समजा एखाद्या कंपनीच्या 10 सभासदांनी 100 एकर हर बना आणि सोयाबीनची लागवड केली आहे  

 *हार्वेस्टिंग*:- कंपनी स्वतः खर्चाने किंवा शेतकरी स्वतः खर्चाने कंपनीद्वारा दिलेल्या हार्वेस्टिंग ने मालाची काढणी करेल

*प्रॉक्यूरमेंट*:- कंपनी या सभासदाकडून एका ठराविक दराने हरभरा आणि सोयाबीन खरेदी करेल

*पुलिंग,ग्रेटिंग*:- कंपनी सर्व माल एका ठिकाणी जमा करून त्या मालाची ग्रेटिंग करेल तसेच कंपनी या मालावर प्रोसेसिंग देखील करू शकल.
समजा हरभरा पासून ग्रेटिंग केलेले हरभरा डाळ आणि बेसन निर्माण केले तर सोयाबीन पासून ग्रेटींग केलेला सोयाबीन पनीर सोयाबीन तेल तसेच इतर पदार्थ तयार करेल

*विपणन विक्री*:-
 कंपनी या मालाची विक्री मार्केटिंग करेल
 या विक्रीतून येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटून घेतील या ठिकाणी जर कंपनीचा कारभार हा दूरदृष्टी आणि सक्षम हातात असेल तर ती कंपनी परिसरातून भरपूर प्रमाणावर खरेदी करू शकते.

शेतकऱ्याचा माल चांगल्या दराने दलाली हमाली वराई आडत कमिशन ट्रान्सपोर्ट यांच्या शिवाय खरेदी केली जाईल यात ते हवा तो दर त्यांना मिळू शकतो.
अर्थात बाजारात प्रोसेसिंग केलेल्या मालाचा दर कसा ठेवतात त्यावर खरेदी दर अवलंबून असतील मालावर प्रक्रिया होऊन जो काही नफा राहील त्यात देखील वाटा राहील.

 जर कंपनीला वाटते की शेतकऱ्यांना तीन-चार महिने शेती वापरण्याचे भाडे म्हणून दोन-तीन हजार रुपये देखील द्यायचे (अर्थात हे कंपनी व्यवस्थापन ठरवणार आहे आणि कंपनीकडे किती खेळते भांडवल राहते त्यावरून ते ठरेल) तर कंपनी देऊ शकते. 
शेतकरी जमिनीचे भाडे मालाला चांगला दर प्रक्रिया केल्यानंतर विक्री होऊन मिळणारा नफा प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार विक्रीसाठी रोजगार तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळू शकतात.
 प्रक्रिया उद्योगाची सबसिडी बँकेकडून कर्ज तसेच इतर फायदे मिळतील.
यात पीक लागवडीसाठी कर्जासाठी सहकारी क्षेत्रातून होणारे कर्ज वाटप यातून मिळणारी कर्ज जास्त योग्य ठरेल.
केवळ कंपनीच्या प्रक्रिया आणि खेळते भांडवल यांसाठी बँकेकडून कर्ज घेणे जास्त योग्य ठरेल.
 आपल्या परिसरात जर शासनाने फूडपार्क किंवा मेगा फूड पार्क स्थापन केली असेल तर त्याठिकाणी शेती उत्पादक कंपनीची निर्माण व्यवस्था असावी लागते. हे फूड पार्क फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन मेगा फूड पार्क फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन राज्य शासनाने निर्देशित केलेले फळप्रक्रिया उद्योग पार्क, Sezs ज्यात फळ प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे आणि केंद्र शासनाद्वारे निर्देशित इतर फूड पार्क येथे जागा असावी लागते या योजनेत नाबार्ड एकूण खर्चाच्या 75% कर्ज उपलब्ध करून देते.

 या योजनेत खालील बाबीचा समावेश होतो

फळे भाजीपाला मशरूम प्लांटेशन पिके आणि इतर फळपिके दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोंबडी आणि इतर मास मासे व इतर समुद्री प्राणी कडधान्य तृणधान्य आणि तेलबिया औषधीवनस्पती जंगलापासून निर्मित वन्यऔषधी कंजूमर फूड प्रॉडक्ट जसे बिक्री इतर रेडी टू इट उत्पादने कार्बोनेट ड्रिंक्स नॉन अल्कोहोलिक
 बिव्हेरेजेस एनर्जी ड्रिंक पॅकेजड ड्रिंक वॉटर सॉफ्ट ड्रिंक इत्यादी
फुट फ्लेवर्स फूट कलर्स मसाले हेल्थ फूड हेल्थ ड्रिंक्स इत्यादी आणि इतर सर्व प्रकल्प जे केंद्रशासन फळप्रक्रिया म्हणून मान्यता देते.

 *फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी स्थापन करावी*
कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्यांची वास्तविक शेती आहे. किंवा दोन आणि त्यापेक्षा जास्त संस्थां ज्या वास्तविक शेती उत्पादन करतात.
किंवा याचा 10 किंवा त्यापेक्षा जास्तचा समजून या कायद्याच्या कलम 581ब मध्ये निर्देशित केलेल्या कृतीसाठी एकत्र येऊन कंपनी कायद्यात अंतर्गत शेती उत्पादन कंपनी स्थापन करू शकतो.
 जर कंपनी रजिस्टार यांच्या कायद्याच्या पालनाबाबत समाधान झाले तर अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसात कंपनी स्थापन केल्याची पूर्तता झाल्याचा दाखला मिळतो म्हणजेच कंपनी स्थापन होते.
 अशा कंपनीच्या सभासदाचे दायित्व लबिलिटी ही कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये निर्देशित केल्यानुसार त्यांनी गुंतवलेल्या शेअर कॅपिटल इतकी मर्यादित राहते. पेड किंवा अनपेड शेअर कॅपिटल कंपनी कशा पद्धतीने कार्य करेल कंपनी स्थापन करीत असताना ज्या सभासदांना घेऊन ती स्थापन झालेली आहे त्यातून किंवा बाहेरून कंपनी एक सी.ई.ओ (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर )ची नेमणूक करतात
कंपनीसाठी सभासदातून एक चेअरमन ची नेमणूक करता येते. 

कंपनीचे शेअर्स हे ट्रान्सफरेबल नसतात सभासदांनी सभासद होताना तीन महिन्याच्या आत सभासदाच्या मृत्यूनंतर कोणास त्याचे सभासदत्व ट्रान्सफर होईल हे कळणे गरजेचे असते.
कंपनी बोर्डाने वर्षातून एकदा जनरल मीटिंग घेणे बंधनकारक आहे त्या मीटिंगची वेळ ठिकाण आणि इतर बाबी सभासदांना कळवणे बंधनकारक आहे.

 कंपनीत किमान 5 तर जास्तीत जास्त 15 डायरेक्टर असावेत कंपनीच्या मेमोरेंडम आणि असोसिएशन वर सही करतील ते डायरेक्टर असतात. फार्मिंग प्रोडूसर कंपनी ही शेतकरी मिळूनच स्थापन करू शकतात.

*फार्मिंग प्रोडूसर ही कंपनी स्थापन केल्यानंतर प्रामुख्याने खालील फायदे मिळतात*

 तृणधान्य कडधान्य व इतर शेती उत्पादने जसे की गहू ज्वारी बाजरी डाळी शेंगदाणे सोयाबीन तूर मूग हरभरा इत्यादी शेतकरी ग्रेडिंग करून पॅकिंग करून सरळ मार्केटमध्ये विकू शकतील.
 शेतकरी स्वतः उत्पादनावर प्रक्रिया करू शकतील.
 नाबार्डच्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्त देखील अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळू शकतो.
शहरातील आपलेच भाऊबंद यांना सरळ शेतकऱ्याकडून माल मिळेल आज मोठ्या कंपन्या टीव्हीवरील जाहिरातीत देखील हाच दावा करतात की आमचे उत्पादन आणि सरळ शेतकऱ्याकडून घेतो.
 कंपनी स्वतःदेखील माळ सरळ ग्राहकास विकू शकते.
आपण जी तक्रार कायम करत आलो आहोत की शेतकरी त्यांच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाहीत ती तक्रार कायमस्वरूपी बंद होईल. गावातच रोजगार निर्माण होईल नैसर्गिक आपत्तीपासून येणारे संकट कमी होईल कारण जरी सभासद सदस्याकडे काही पिकली नाही तरी बाहेरून आणून त्यावर प्रक्रिया करून उद्योग आणि रोजगार सुरू राहील.

 फार्मिंग प्रोडूसर कंपनी मुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच आहे गरज आहे ती केवळ त्याचा फायदा करून घेण्याची.
सर्वात आधी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की शेतकरी जे पिकवतो ते खाल्ल्या शिवाय जग जगू शकत नाही. त्यामुळे जगाची चावी आपल्या हातात आहे ही जाण असणे गरजेचे आहे.
सरळ उत्पादक आता गिऱ्हाईकशी बोलणार असल्याने त्या वेळेस हे असे सत्य मनात ठेवून सर्व मार्केटिंग जाहिराती वगैरे डिझाईन करता येतील
➖➖➖➖➖➖➖➖ *उदाहरणार्थ*:- जर तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे तुमच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात जर 10,000 शेअर्स फोल्डर किंवा सभासद झाले.आणि प्रत्येकी 1000/- हजार रुपये सभासद फी लावली तर 10000×1000=1,00,000,00 एक करोड रुपये जमा होतात.
आणि जर 500 रुपय लावले तर 10,000×500=50,00,000/- पन्नास लाख रुपये जमा होतात.
हे एक उदाहरण आहे. 
हे सारे पैसे तुम्ही शेतीशी निगडीत मोठ्या प्रोजेक्टमध्ये लावू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖
Farmers Producer Company 
Year Singend 2002 was Passed Section 465(1) Special in Seetin 58B Company Act 1956 part IXA Section 58!A to 58!ZT into
Company Act 2013
Act 2014 Regulations 
FARMERS PRODUCERS COMPANY Each Shers Value is 10 Rs. 
Tax Benefit 
Indian Income Tax Act 1961(the It Act)
Agriculture income Under Section 10(1)
➖➖➖➖➖➖➖➖
*फार्मर प्रोड्यूसर कंपनी ही स्वतःच्या शेतकरी सभासदाला आर्थिक कर्ज सुद्धा देऊ शकते.*.

*फार्मर प्रोड्युसर कंपनी ही कंपनीच्या सभासदाकडून बँक सोसायटी सारखे डिपॉझिट सुद्धा घेऊ शकते* 
जसे की, 
सेविंग अकाउंट
फिक्स डिपॉझिट
पिग्मी डिपॉजिट
मंथली इंटरेस्ट स्कीम
रिकरिंग डिपॉझिट
➖➖➖➖➖➖➖➖

 *आशा फार्मर प्रोडूसर कंपन्या प्रत्येक गावात शहरात सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत*

 *अतिशय कमी खर्च मध्ये आम्ही फार्मिंग प्रोडूसर कंपनी चे नियोजन करून देत आहोत*:-

 जसे की, 
1) फार्मर प्रोडूसर कंपनी ची नोंदणी लायसन परवाने मिळवून देणे.
2) फार्मर प्रोड्युसर कंपनी चे सॉफ्टवेअर मिळवून देणे
3) फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक मंडळाची उभारणी कशी करावी.
4) भाग भांडवल उभा कसे करावे.
5) फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या इतर शाखा कशा ओपन कराव्यात.
6) फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या सभासदांना कर्ज देणे व्याजदर लावने इत्यादी
7) फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या सभासदांच्या ठेवीचे व्याजदर ठरवणे
8) फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये कर्मचारी/स्टॉप भरती करणे
9) फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ऑडिट कुठे व कसे करावे.
10) फार्मर प्रोड्युसर कंपनीचे बँक खाते कोणत्या बँकेत उघडावे
11) कंपनीचे शेअर्स कॅपिटल वाढवणे कंपनीचा ऍड्रेस बदलणे संचालक मंडळामध्ये नवीन मेंबर वाढवणे किंवा जुने मेंबर कमी करणे.
12) तसेच कंपनी चालवण्यासाठी आणखी काही जे लायसन्स परवाने लागतात
 जसे की, 
 FSSA फुड लायसन
 MSME उद्योग आधार
 IEC एक्स्पोर्ट इम्पोर्ट 
 GST रजिस्ट्रेशन
 ISO 9001:2015 सर्टिफिकेट
 ISO 22000 सर्टिफिकेट
 ISI मार्क सर्टिफिकेट
 BRC सर्टिफिकेट
Ayush सर्टिफिकेट
Halal सर्टिफिकेट
APEDA सर्टिफिकेट
 ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन
 पेटेंट रजिस्ट्रेशन
 व इतर सर्व प्रकारचे परवाने लायसन लागतील ते काढून देऊ.
13) सभासदासाठी प्रायव्हेट एटीएम मशीन पण लावू शकता

*फार्मर प्रोड्यूसर कंपनी ओपन करण्यासाठी लागणाऱ्या बाबी*:-

कमीत कमी 5 शेतकरी लोकांचे संचालक मंडळ
कमीत कमी 5 लाख शेअर्स कॅपिटल जे तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या बँक खात्यात ठेवावी लागते.
स्वतःची किंवा भाड्याची जागा 

10 शेतकरी लोकांचे खालील डॉक्युमेंट 
Document👇
 पॅन कार्ड
 आधार कार्ड
 मतदान कार्ड
 एक फोटो
 सातबारा
 बँक स्टेटमेंट
 ई-मेल आयडी
 मोबाईल नंबर
ऑफिस ऍड्रेस साठी लाईट बिल किंवा रेंट एग्रीमेंट 

*फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्ट्रेशन/नोंदणी कालावधी कमीत कमी 15 ते 20 दिवस*

*फार्मर प्रोड्युसर कंपनी ला तुम्ही खालील दिल्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची नावे देऊ शकता*:-

 उदाहरणार्थ:-👇
1) सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

2) प्रतिभा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

3) भूमित्र सेल्फ रिलायन्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

4) श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड

5) कृषी उत्नाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

6) सावित्रीबाई फुले शेळी पालक फार्मिंग प्रोडूसर कंपनी लिमिटेड

7) कुशल अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

8) कडेगाव तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

9) शेतकरी उत्पादन कंपनी लिमि

10) यशशिवनी अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड

 इत्यादी प्रकारचे नावे देऊ शकता
➖➖➖➖➖➖➖➖

*नोट*:-
 *ज्या लोकांना फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करायची असेल अशाच लोकांनी आम्हाला फोन करावा किंवा अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप ला मेसेज करावा टाईमपास करणाऱ्या लोकांनी आमचा आणि स्वतःचा वेळ वाया घालू नये ही नम्र विनंती*


Address :-
1672 E ward Rajarampuri 10th lane Kolhapur 

➖➖➖➖➖➖➖➖

*शेतकरी बंधूंनो नमस्कार*

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना विषयी जर कोणाला काही शंका असेल प्रश्न असेल तर विचारू शकतात ?
ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची आहे त्यांनी त्वरित कागदपत्र जमा करावे व कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करावी..

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क 
Garcinia federation 
Sandeep Shahapurkar 
Managing Director 7588619723
Garciniafederation@gmail.com

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes