कोल्हापूर
मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील रहदारीचा सार्वजनिक डांबरीकरण रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. फांद्या तोडायची परवानगी असताना वृक्ष पुर्ण तोडले बद्दल कारवाई करावी अशी मागणी स्वरा वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते.
तलेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत.
वृक्ष तोड झालेल्या ग्रामस्थां, आझाद हिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्ते आर. डी. शिंदे, बाबासाहेब कांबळे यांनी कामगार तलाठी याना दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले. या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी. दोषींवर कार्यवाही अशी मागणी अध्यक्षप्रमोद जनार्दन माजगावकर यांनी निवेदनातून केली आहे.