Awaj India
Register
Breaking : bolt
शिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारडॉ. भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारआरती वैशाली मनोहर कांबळे यांना मूकनायक पुरस्कार कोल्हापूरकोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे व्यसनमुक्ती अभियानसागर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. जितेंद्र भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कारगायक नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार

जाहिरात

 

कोजिमाशितील लाडांची एकाधिकारशाही संपुष्टात आणा ! - बाबा पाटील

schedule02 Jul 22 person by visibility 12291 categoryराजकीय

आवाज इंडिया प्रतिनिधी

 कोल्हापूर

          कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेमध्ये सेवानिवृत्त झालेले दादा लाड हे नेतृत्व कशासाठी करीत आहेत ? . त्यांनी नैतीकता शिकावी. त्यांची कोजिमाशितील एकाधिकारशाही व मक्तेदारी संपुष्टात आणा असे आवाहन विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे उमेदवार बाबा पाटील यांनी प्रचार दौऱ्यात सभासदांना केले .
            श्री. पाटील पुढे म्हणाले ' कोजिमाशि पतसंस्था कोणी निर्माण केली ? कोणी वाढवली ? हे सूज्ञ सभासदांना माहिती आहे . पण या संस्थेला गिळंकृत करण्याचे काम ठराविक चौकडीकडून सुरु आहे जे सेवेतून निवृत्त झाले आहेत ते या संस्थेचे राजकारण व सत्ताकारण पहात आहेत हे संस्थेचे व सभासदांचे दुदैव आहे . संस्था सक्षमपणे चालवणारी मंडळी शिक्षण वर्तुळात असताना ठराविकांचीच मक्तेदारी का ? जे एक -दोन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत व जे दहा पंधरा वर्ष संचालक मंडळात सत्ता भोगत आहेत त्यांनाच सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी का दिली आहे ? अन्य कोण लायक नाही का ? दादा लाड आणि कंपनी या संस्थेत निर्माण झाली आहे . सभासद हित न पाहता ते मित्रहित जास्त जपतात त्यातच त्यांचे कटकारस्थान पहायला मिळते .
          सभासदांची दिशाभूल करून संस्थेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या मंडळींपासून वेळीच सावध राहिले पाहिजे . सभासदांनी भूलथापांना बळी न पडता राजर्षि शाहू आघाडीच्या पाठीशी ठाम राहून दादा लाड यांची या संस्थेतील मक्तेदारी मोडून काढावी असेही श्री . बाबा पाटील यांनी आव्हान केले .
         मोठा जनसंपर्क व प्रचंड लोकसंग्रह
         असणाऱ्या उमेदवारास डावलल्याचे आश्चर्य !

       कोजिमाशिचे सभासद प्रिय संचालक असणारे व ज्यांचा मोठा जनसंपर्क व प्रचंड लोकसंग्रह आहे . ज्यांच्याकडे स्वकर्तृत्व आहे अशा बिद्रीच्या दूध साखर कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा .एच .आर . पाटील (कोनवडेकर ) यांना सत्ताधारी दादा लाड यांनी उमेदवारी डावलली याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे . श्री .पाटील हे भुदरगड तालुक्यातील असले तरी त्यांचा शाहूवाडी पन्हाळ्यापासून चंदगडच्या टोकापर्यंत सातत्यपूर्ण संपर्क आहे . सभासदांच्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणाऱ्या व अडीअडचणीला कधीही धावून येणाऱ्या , कोरोनाकाळात व महापूराच्या काळात सामान्यांना आधार देणाऱ्या जिल्हयातील साडेआठशे शाळापैकी सातशे शाळांशी सतत संपर्क असणाऱ्या विद्यमान संचालक प्रा . एच . आर .पाटील यांना उमेदवारी डावलल्याने सभासदात प्रचंड नाराजी पसरली आहे . त्यांची या निवडणूकीत परिणिती निश्चित दिसणार आहे . त्यांची भूमिका काय राहाणार ?याची सभासद वर्गात जोरदार चर्चा सुरू आहे . त्यांच्या भूमिकेवरच या निवडणूकीचा कल व भवितव्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे . त्यामूळे प्रा . पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes