Awaj India
Register
Breaking : bolt
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम

जाहिरात

 

निष्ठावंत भीमसैनिकांचा देशसेवेकडे गौरवशाली प्रवास

schedule14 Jan 26 person by visibility 370 category


कोल्हापूर :
चुये  (ता. करवीर) येथील तीन निष्ठावंत भीमसैनिकांनी भारतीय सैन्याच्या परीक्षेत यश संपादन करून आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीने संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे. देशसेवा हेच जीवनाचे ध्येय मानून त्यांनी केलेली ही कामगिरी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिषेक आनंदा कांबळे यांचा संघर्षमय प्रवास विशेष भावणारा आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आजी, चुलते व चुलती यांच्या आधारावर त्यांनी जीवनाची वाटचाल केली. प्रतिकूल परिस्थिती असूनही शिक्षणाचा ध्यास न सोडता महाविद्यालयीन शिक्षण घेतले. “कष्टाशिवाय पर्याय नाही,” ही जाणीव मनाशी बाळगून दररोज कठोर सराव केला आणि अखेर आर्मीच्या परीक्षेत यश मिळवले.
रोहन कांबळे यांचे वडील धनाजी गवंडी काम करून कुटुंबाचा गाडा चालवतात. घरची परिस्थिती जाणून रोहन यांनी ऊन-पाऊस न पाहता कष्टालाच एकमेव आधार मानला. कोणतीही तडजोड न करता निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आर्मीच्या परीक्षेत यश संपादन केले.
साहिल विलास कांबळे यांचे वडीलही मिळेल ते काम करून कुटुंब चालवतात. गरिबीची जाणीव ठेवत “कष्ट हेच आपल्याला तारतील” असा निर्धार त्यांनी केला. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि चुलते सैन्यातील माजी अधिकारी, माजी सैनिक कॅप्टन बाबुराव कांबळे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे साहिलनेही आर्मीच्या परीक्षेत यशाचा ध्वज फडकावला.
या तिघांची कहाणी संघर्षातून उभ्या राहिलेल्या विजयाची आहे. देशसेवेची ओढ, कुटुंबाचा पाठिंबा आणि अढळ मेहनत यामुळे असंभवही शक्य होतो, हेच या यशाने दाखवून दिले आहे. करवीर तालुक्याच्या या सुपुत्रांनी देशासाठी उचललेले पाऊल आज अनेक स्वप्नांना नवी दिशा देणारे ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes