दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादन
schedule26 Jul 26 person by visibility 9 categoryराजकीय
कोल्हापूर:
दीक्षाभूमीच्या स्मारकाचे शिल्पकार, बिहार, सिक्किम व केरळचे माजी राज्यपाल तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय स्मृतीशेष रा. सु. तथा दादासाहेब गवई यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगच्या हॉलमध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांनी दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादन प्रसंगी बोलताना बबनराव शिंदे यांनी दादासाहेब गवई यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाची माहिती दिली आणि त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणाले की, "गवई साहेबांना खरी आदरांजली द्यायची असेल तर सर्व आंबेडकरवादी समाज व संघटनांनी एकत्र येऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी आपली ताकद एकत्र केली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तनाची क्रांती घडू शकते." सोमनाथ घोडेराव यांनीही गवई साहेबांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, निवास कांबळे (सडोलीकर), मारुती गायकवाड, साताप्पा कांबळे (केर्लीकर), बाजीराव गायकवाड, संजय शिंदे, श्रीकांत कांबळे, अमोल कांबळे, संदीप हेर्लेकर, दीपक कुरणे, विनोद चव्हाण, शामराव भोसले, सतीश निंबाळकर, पांडुरंग सडोलीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.