Awaj India
Register
Breaking : bolt
*बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवड

जाहिरात

 

जागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त विशेष: पत्की हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन!

schedule26 Jul 26 person by visibility 453 categoryआरोग्य

 
​२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाटील दांपत्याच्या आयुष्यात आले बाळ; गुंतागुंतीच्या प्रसंगात डॉक्टरांनी वाचवले माता व बाळाचे प्राण
​कोल्हापूर:
जागतिक आय.व्ही.एफ. दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील प्रसिद्ध पत्की हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ वैद्यकीय यशोगाथा समोर आली आहे. २५ जुलै १९७८ रोजी जगातील पहिल्या आय.व्ही.एफ. बाळाचा जन्म झाला असल्याने हा दिवस 'जागतिक आय.व्ही.एफ. दिन' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पत्की हॉस्पिटलचे डॉ. सतीश पत्की यांनी एका रुग्णाच्या वैद्यकीय प्रवासाची माहिती दिली.  
​२४ वर्षांची प्रतीक्षा आणि खडतर प्रवास
​पन्हाळा तालुक्यातील माले येथील शेतकरी श्री. संभाजी पाटील (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील (वय ४२) यांच्या लग्नाला तब्बल २४ वर्षे झाली होती. अनेक वर्षांच्या अयशस्वी उपचारांनंतर निराश झालेल्या या दांपत्याला त्यांच्या कौटुंबिक डॉक्टर संदीप काळे यांनी पत्की हॉस्पिटलमध्ये आणले.  
​पहिल्या आय.व्ही.एफ. प्रयत्नात यश आले, परंतु दुर्दैवाने पाचव्या महिन्यात गर्भपात झाला. या आघाता नंतरही डॉक्टरांच्या योग्य समुपदेशनामुळे आणि विश्वासामुळे पाटील दांपत्याने दुसऱ्यांदा उपचार सुरू केले. या वेळी उपचार यशस्वी झाले आणि गरोदरपणाचा संपूर्ण काळ अत्यंत काळजीपूर्वक आणि नियमित तपासण्यांसह पार पडला.  
​ऑपरेशन टेबलवर ओढावले मोठे संकट
​नववा महिना पूर्ण झाल्यानंतर १३ जुलै २०२६ रोजी नियोजित सिझरियन शस्त्रक्रिया ठरवण्यात आली होती. सर्व प्राथमिक तपासण्या समाधानकारक होत्या आणि भूल देण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अचानक एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सौ. जयश्री अचानक कोसळल्या आणि त्यांचा रक्तदाब धोकेदायक पातळीपर्यंत खाली गेला.  
​वैद्यकीय भाषेत या घटनेला 'सडन मॅटर्नल कोलॅप्स' (Sudden Maternal Collapse) असे म्हणतात. हा प्रसूतिशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा प्रसंग मानला जातो. आईची प्रकृती बिघडल्याने गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मंदावू लागले होते.  
​डॉक्टरांची तत्परता आणि यशस्वी प्रसूती
​अशा अत्यंत नाजूक प्रसंगी अनुभव, संयम आणि उत्तम समन्वयाच्या जोरावर डॉक्टरांच्या टीमने कृत्रिम श्वसनयंत्त्राच्या (व्हेंटिलेटर) साहाय्याने तातडीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. सौ. जयश्री यांनी एका सुदृढ मुलाला जन्म दिला.  
​शस्त्रक्रियेनंतर मातेची प्रकृती स्थिर करण्यासाठी त्यांना पुढील २४ तासांसाठी डायमंड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुन्हा पत्की हॉस्पिटलमध्ये बाळाजवळ आणण्यात आले.  
​वैद्यकीय टीमचा आणि पाटील दांपत्याचा सत्कार
​या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सौ. उज्ज्वला पत्की, डॉ. सुहृद पत्की, डॉ. आदिती कुंटे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी व डॉ. साईप्रसाद यांनी मोलाची भूमिका बजावली.  
​जागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त पाटील कुटुंबाने सर्व डॉक्टरांच्या टीमचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. तसेच पत्की हॉस्पिटलच्या वतीने डॉ. श्वेता कुलकर्णी व डॉ. सुहृद पत्की यांनी सौ. जयश्री व श्री. संभाजी पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes