बौद्ध धम्म प्रसारात सचिन कदम यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य
schedule20 Jan 26 person by visibility 21 categoryसामाजिक
कोल्हापूर | प्रतिनिधी
समाजातील समता, बंधुता व मानवतेची मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने कार्य करणारे दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील सचिन पांडुरंग कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध धम्म प्रसाराच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत.
दि. 28 एप्रिल 1989 रोजी जन्मलेले सचिन कदम हे शिक्षणाने बारावी उत्तीर्ण असून सध्या युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करत आहेत. नोकरी करत असतानाही त्यांनी सामाजिक भान जपत सन 2018 पासून आजपर्यंत करवीर तालुक्यात बौद्ध धम्म प्रचार व प्रसाराचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.
बौद्ध धम्मातील करुणा, प्रज्ञा आणि समतेचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. विशेषतः युवकांमध्ये धम्मविचार जागृती, समाजप्रबोधन तसेच वंचित घटकांसाठी सामाजिक जाणिवेचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
सचिन कदम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना
राज्यस्तरीय जनसेवा समाजरत्न प्रेरणा पुरस्कार तसेच
राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज आदर्श युवा रत्न पुरस्कार
या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या या कार्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत असून, अनेक तरुणांना सामाजिक व धम्म कार्यासाठी प्रेरणा मिळत आहे. भविष्यातही ते समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात करावे, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.