Awaj India
Register
Breaking : bolt
आदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे २५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

आदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्य

schedule13 Jan 26 person by visibility 11 categoryसामाजिक

कोल्हापूर प्रतिनिधी —
तेजस्वीनी संजय सिंह देसाई या एक आदर्श शिक्षिका, कर्तव्यदक्ष माता व समाजसेविका म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात परिचित आहेत. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन तसेच होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल येथे त्यांनी मराठी व हिंदी विषयाच्या शिक्षिकेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. याशिवाय न्यू मांडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी अनेक वर्षे बालसंस्कार वर्ग घेतले असून या वर्गातून अनेक सुसंस्कृत विद्यार्थी घडले आहेत.
शैक्षणिक दृष्ट्या त्या B.A., M.A., B.Ed. पात्रताधारक असून अलीकडेच त्यांनी मुद्रित (Exam) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या बालसंस्कार वर्गांची आज नितांत गरज असताना, त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना आदर्श माता, आदर्श शिक्षिका, गुणवंत समाजसेविका, आदर्श काउन्सिलिंग काऊन्सलर पुरस्कार, सरोज चषक पुरस्कार, पूर्णागिनी पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार सन्मानपत्र, संत रोहिदास पुरस्कार तसेच अनेक सन्मानपत्रे व गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत. अखिल मराठा महासंघात महिला संघटक पदी त्यांची निवड झाली असून त्या कोल्हापूर विज्ञान परिषदेच्या सक्रिय सदस्या आहेत.
मानवतावादाचा आदर्श ठेवत त्या बालसंकुल, कोल्हापूर येथे जाऊन तेथील अनाथ मुलांना श्लोक, मंत्र, बालसंस्कार वर्ग तसेच मराठी व हिंदी विषयांचे विना मोबदला मार्गदर्शन करतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व एकीकडे अतिशय मायाळू तर दुसरीकडे शिस्तप्रिय व कडक असे संतुलित आहे.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी वैधव्य आले तरीही न खचता, दोन मुलांना आदर्शवत घडवत स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सदैव हसतमुख राहून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे कार्य त्या सातत्याने करतात. त्यांचे हे प्रेरणादायी कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरत असून अनेकांना सेवाभावाने काम करण्याची प्रेरणा देत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes