डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*
schedule04 Dec 25 person by visibility 10 categoryशैक्षणिक
*डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*
*७ डिसेंबरला जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी होणार सहभागी*
साळोखेनगर : येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने0यांनी दिली.
कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने म्हणाले, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या संकल्पनेतून बारावी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची सुरुवात केली होती. सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला असाधारण महत्त्व आहे. नागरी आणि विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच आयटी क्षेत्र किंवा एआयएमएल यांसारखी नवीन क्षेत्र असतील यामध्ये गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्राच्या सीईटी परीक्षेच्या धर्तीवर या परीक्षेचे स्वरूप असल्याने ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून ही परीक्षा घेतली जाते. तसेच गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड दूर करण्यासाठी या संधीचा फायदा होईल आणि गणित विषयाची आवड निर्माण होईल या उद्देशाने गेली 7 वर्ष महाविद्यालय या परीक्षेचे आयोजन केले जात आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा मधील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
बहुपर्यायी पद्धतीने होणाऱ्या १०० गुणांच्या या परीक्षेत ५० प्रश्न असतील. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी सीईटीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सीईटी परीक्षेचा सराव या परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. तसेच परीक्षेनंतर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून शंका निरसन आणि करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या परीक्षेचा निकाल ३१ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार, 10 हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच परीक्षेसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन अथवा www.coes.dypgroup.edu.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांनी केले आहे.