चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा
schedule02 Dec 25 person by visibility 26 categoryसामाजिक
श्री दत्त प्रासादिक भक्त मंडळ, चुये
श्री दत्त जयंती सोहळा २०२५
कोल्हापूर :
परम पूज्य धन्वंतरी पुरी बाबा महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व दत्तभक्त, ग्रामस्थ व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
📅 दैनंदिन कार्यक्रम :
मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५
- सकाळी ५.०० वा. : श्रींच्या मूर्तीस अभिषेक
- सकाळी ६.०० वा. : आरती
- सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- दुपारी ३.०० ते ६.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- सायंकाळी ६.०० वा. : आरती
- सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. : श्री संत बाबामहाराज आर्विकर रचित सामूहिक प्रार्थना
- सायंकाळी ७.१५ ते ९.१५ वा. : श्री पंत सांप्रदाय भजनी मंडळ, कोगे यांचे भजन कार्यक्रम
बुधवार, दि. ०३ डिसेंबर २०२५
- सकाळी ६.०० वा. : आरती
- सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- दुपारी ३.०० ते ६.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- सायंकाळी ६.०० वा. : आरती
- सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. : श्री संत बाबामहाराज आर्विकर रचित सामूहिक प्रार्थना
- सायंकाळी ७.०० ते ९.०० वा. : श्री स्वामी माऊली भजनी मंडळ, ठिकपुर्ती यांचे भजन कार्यक्रम
गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५
- सकाळी ६.०० वा. : आरती
- सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- दुपारी २.०० ते ३.०० वा. : गुरुचरित्र पारायण
- दुपारी ३.०० ते ६.०२ वा. : श्री दत्त जन्मकाळ सोहळा
- सायंकाळी ६.१५ ते ६.४५ वा. : आरती
- सायंकाळी ७.०० ते १०.०० वा. : महाप्रसाद
या तीन दिवसांच्या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.