Awaj India
Register
Breaking : bolt
अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

जाहिरात

 

अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटप

schedule23 Oct 26 person by visibility 18 category


आठ हजार पाण्याच्या बाटल्या अशा पद्धतीने उपवासाच्या पदार्थांचे वाटप.

श्रीमंत  संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सात हजाराहून अधिक भाविकानी घेतला लाभ 
जुना राजवाडा परिसरात झाला उपक्रम 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) - देशातल्या साडे तीन शक्ती पी ठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शारदिय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, उद्योजक राहूल सुनीता राजेंद्र पालांडे , अमेरिकेतील उद्योजिका सौं स्नेहल शहाजी आर्किले, 
 विराज साधना वसंत महाडिक आणि पुण्यातील उद्योजिका डॉ.रूपा शिरसाठ यांच्या वतीने अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी उपवासाचे पदार्थ आणि फळे वाटप उपक्रम राबवण्यात आला. तब्बल चारशे किलो शाबू - बटाटा खिचडी, एक टन केळी, शंभर किलो बटाटा वेफर्स,  तब्बल आठ हजार पाण्याच्या बाटल्या आणि चार हजार राजगिरा लाडू वाटप झालेला अलीकडच्या काळातील कोल्हापुरातला हा पहिलाच उपक्रम ठरला.
जुना राजवाडा परिसरात श्रीमंत  सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते नवरात्राच्या सातव्या माळेचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तब्बल सात हजाराहून अधिक अंबाबाईच्या भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी कु राहूल सुनीता राजेंद्र सुनीता पालांडे यांच्यासह कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमर शिवाजीराव चव्हाण, अमेरिकेतील उद्योजिका सौ स्नेहल आर्किले,विराज महाडिक, वसंतराव महाडिक,सौ साधना महाडिक, सौ रुपाली चव्हाण 
यांनी परिश्रम घेतले.
वैशिष्टय म्हणजे या उपक्रमानंतर जुना राजवाडा परिसराची पुन्हा काटेकोर स्वच्छता करुन जुना राज वाडा आणि अंबाबाई मंदिर परिसराचे पवित्र्य जपण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes